अस्वलीच्या हल्ल्यात गावकरी गंभीर जखमी

चंद्रपूर/अमोल जगताप:
सरपण गोळा करायला गेलेल्या गावकऱ्यावर जंगलात असलेल्या अस्वलीने हल्ला चढविला,या हल्ल्यात 
भाऊराव लक्ष्मण सामुसागडे मु.नवरगाव ता.सिंदेवाही जि.चंद्रपुर ह्या इसम गंभीररीत्या जखमी झाला.


  सविस्तर वृत्त या प्रमाणे भाऊराव  समुसागडे हे काही सहकाऱ्यांन सोबत सरपण गोळा करण्यासाठी गेले असता नवरगाव येथील कंपार्टमेंट क्र.४४ मध्ये अचानक अस्वलाने हल्ला चढवला. ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात येताच ते लागलीच मदतीला धावले आणि भाऊरावांची हल्ल्याततुन सुटका केली.हल्ल्याची माहिती कळताच वनविभागाने अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणी जखमी रुग्णाला तातडीने  शासकीय रुग्णालयात चंद्रपूर येथे वॉर्ड क्र.४ मध्ये दाखल करून जखमी उपचार सुरू केले आहेत.
सध्या परिसरात अस्वलीचा मोठ्या प्रमाणात वावर असून दररोज जंगलात सरपण गोळा किंवा जळाऊ लाकूड तोडण्यासाठी जात असलेल्या लोकांना हे अस्वल दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे