शिवसेनेच्या वतीने भंडारा येथे आंदोलन

 मनोज चिचघरे/पवनी(भंडारा):

 देव्हाडी येथे तुमसर- गोंदिया राज्यमार्गावर उड्डाणपूलाचा काम सुरु आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला अप्रोज पुलावर अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अंशचा भराव करण्यात येत आहे. पावसाळ्यात दगडी पुलातून पाण्यासह राख पोचमार्गावर वाहून आली आहे. पोचमार्ग अरुंद असल्याने मोठी- लहान वाहने राखेवरून जात असतात. त्यामुळे राखेचा धुराळा परिसरात दिवसभर उळत असतो. आरोग्यास अत्यंत अपायकारक अशी हि राख म्हणून फ्लाय अंश आहे. राख हवेत उडू नये म्हणून पोच मार्गावर पाणी शिंपडले जाते. परंतु मागील दहा दिवसांपासून पाणी शिंपडणे बंद आहे. धुराळ्यात समोरचे वाहन दिसत नाही. प्रवासी अंधुक प्रकाशात वाहने चालवीत असतात. याच उड्डाणपुलाजवळ अनेक अपघात होतात. एक वर्षांपूर्वी एका जेष्ठ नागरिकाचा खड्यामध्ये पडून मृत्यू झाला होता.
तुमसर- गोंदिया या प्रमुख राज्यमार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी राहत असल्याने येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे. प्रवाशी या मार्गावरून जाताना जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. उड्डाणपूलाचा काम चार वर्षांपासून सुरु आहे परंतु कंत्राटदारानी अजूनपर्यंत कामाचा सूचना फलक लावलेला नाही.
पोचमार्ग काटकोन त्रिकोणात तयार करण्यात आला आहे. खापा मार्गाने येणाऱ्याला प्रथम पोचमार्ग दिसत नाही. याच मार्गावर मोठा खड्डा आहे. रस्ता तयार करणे व वाहतुकीचे अनेक नियम आहेत.
सदर मार्गाशेजारी चार महिन्यांपासून फ्लाय अंश (राख) पडून आहे. आरोग्यास अपायकारक असलेली राख कंत्राटदाराने अद्यापर्यंत उचललेली नाही. कंत्राटदार व अधिकाऱ्यांची यामध्ये साटलोट दिसून येत आहे. नियमानुसार काम होतांना दिसत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व नियमांची पायदळी तुडविणाऱ्यावर कार्यवाही करावी. मा. तहसीलदार साहेब यांना दि. १६.११.२०१८ रोजी दिलेल्या निवेदनातून एकही मागणी पूर्ण न झाल्यामुळे दि. ७.१२.२०१८ शुक्रवार रोजी उड्डाणपूलाचा काम बंद पाडून शिवसेना भंडारा जिल्ह्याचा वतीने जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. करिता शासनाने या प्रकरणाची संवेदनशीलपणे व गांभीर्याने दखल घ्यावी. अशा स्मरणपत्र शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले तसेच या स्मरणपत्राची प्रत मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. श्री. रामदास कदम, पर्यावरणमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. श्री. एखनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री भंडारा जिल्हा, मा. श्री. शांतनू गोयल, जिल्हाधिकारी भंडारा जिल्हा, मा. मनोज सीडाम, पोलीस निरीक्षक तुमसर यांना देण्यात आले.
यावेळी स्मरणपत्र देताना शिवसेना तुमसर- मोहाडी विधानसभा प्रमुख शेखर कोतपल्लीवार, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, शिवसेना भंडारा जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा अध्यक्ष जगदीश त्रिभुवनकर, तालुका अध्यक्ष गुड्डू डहरवाल, विभाग प्रमुख किशन सोनवाने, शाखा प्रमुख हेमंत मेश्राम सह शिवसैनिक उपस्थित होते.