उमेश तिवारी/करंजा (घाडगे)
अज्ञात वाहनाच्या घटनेत एक अस्वल जखमी झाल्याची घटना आज सकाळी राजनी शिवारात पहाटेच्या सुमारास घडली या संदर्भात ओरिएंटल टोल नाका कर्मचारी रितेश चव्हाण आणि रामभाऊ डाखोळे यांनी वन विभागाला माहिती देताच वन विभागाचे वन परिषद अधिकारी दा.वि. राऊत,क्षेत्र सहायक लोणकर,कांबळे,डोबल,कडसाईत, सोनवणे अधिकारी आणि कर्मचारी इत्यादी तात्काळ घटना स्थळ गाठले आणि वन विभागाच्या गाडी मध्ये अस्वलीला गाडीत टाकून आमझिरी रोपवाटिका गारपीट येथे नेऊन अस्वलीवर उपचार करण्यात आला.
अस्वलीला हाताला आणि डोक्याला जबर मार असून पुढील उपचाराकरिता अस्वलीला नागपूरला नेण्यात आले.
माहितीनुसार अस्वलीचा आपघात हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना घडली असावी. ही घटना कारंजा वनपरीक्षेत्र येथील आहे.
 


 
 
 
 
