चिमुर येथे नोकरी संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चिमूर/रोहित रामटेके:
चिमूर क्रांतिभुमी मधील विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगार युवकांसाठी आज हुतात्मा स्मारक येथे नोकरी शोधनाऱ्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्रगती फाउंडेशन तर्फे करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्या पर्यंत नोकरीच्या संधी पोहचत नाहीत, व ग्रामीण भागात राहणाऱ्या बेरोजगारांना मुलाखत कोणत्या पद्धतीने घेतात त्या बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मा.श्री.राहुल हरडे सर मुख्य मार्गदर्शक होते.या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून अनेक बेरीजगारांना मुलाखत कोणत्या पद्धतीने घेतात याचे थेट प्रक्षेपण करून दाखवले.
        कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रगती फाऊंडेशन च्या संथापक हिमानी वारजूकर यांनी सम्पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.