गोंडपिपरी C.M.चषक खो-खो स्पर्धेत सोनापूर देशपांडे संघ उपविजेता

भविष्यात सोनापूर देशपांडे मध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण करु.- दिपक सातपुते सभापती पं.स.गोंडपिपरी
चुरशीच्या सामन्यात खराळपेठ संघाला विजेतेपद

चंद्रपूर/प्रतिनिधी :
राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी तालुक्यात आयोजित तीन दिवसीय C.M.चषक खो-खो स्पर्धेतील अत्यंत चुरशीच्या सोनापूर देशपांडे आणी खराळपेठ संघाच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ठ प्रदर्शन करीत खराळपेठ संघ विजेता तर सोनापूर देशपांडे उपविजेता ठरला.

गोंडपिपरी तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सोनापूर देशपांडे आणी खराळपेठ या दोन्ही गावांनी खो-खो स्पर्धेत दबदबा निर्माण केला असून चांगले खेळाडू निर्माण केले आहेत परंतु खेळाडूंची आर्थिक परिस्थिती,साहित्य,चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळत नसल्यामुळे कुठेतरी हे गावे देशासाठी दर्जेदार खेळाडू देण्यास अपयशी ठरत आहेत.परंतु C.M.चषकच्या आयोजनाचे क्रीडा क्षेत्रात आपलं करियर घडविण्याची संधी पुन्हा एकदा ग्रामीण भागातील खेळाडूंना निर्माण झालेली आहे आणी येत्या काही वर्षात नक्कीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करेल यात काही शंका नाही.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ धोटे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात राजुरा विधानसभा ही C.M.चषक स्पर्धेत रेकार्डब्रेक खेळाडूंची नोंद करीत तब्बल चौथ्या क्रमांकवर पोहचली आहे.