असा ही आदर्शपणा

जुन्नर / आनंद कांबळे

शैक्षणिक क्षेत्रात अधिकारी म्हटले की,चुका काढणे ,गुरुजीना विनाकारण त्रास देणे असे प्रकार अधिकारी करत असतात ,पण आज एक विद्यार्थ्यांनीचा पुढील काळातील सर्व शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी अधिकारी घेतो, हाच गुरुजीना सुखद धक्का .

याबाबतची घटना अशी की ,जुन्नर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पी.एस मेमाणे हे बालिका दिनानिमित्त शाळेना भेट देत होते.त्यांनी अचानकपणे काठेवाठी शाळेस भेट दिली. शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे,असे असताना त्यांनी विद्यार्थीशी वैयक्तिक हितगुज केले.

त्यावेळी इयत्ता पहिलीतील एक चुणचुणीत मुलगी साहेबांशी धीटपणे बोलत होती.तिच्याशी मेमाणे यांनी अधिक चौकशी केली असता तिने सांगितले की मी साक्षी पांडुरंग मुठे ,मला शाळा खूप आवडते.मला खूपृ खूप शिकून मोठे व्हावयाचे आहे म्हणून मी ४ते ५ किलोमीटर प्रवास करत डोंगर दरीतून चालत  शाळेत येते.

है ऐकून  गटशिक्षणाधिकारी मेमाणे यांना धक्काच बसला.तिला जवळ घेत तिला आधुनिक झाशीची राणीची लेक म्हणून तिचा गौरव केला.

यापुढील काळात या मुलीचा संपूर्ण शैक्षणिक खर्च  करण्याचा मनोदय त्यांनी  व्यक्त केला.गटशिक्षणाधिकारी मेमाणे यांची शैक्षणिक तळमळ पाहून शिक्षण  क्षेत्रात  काम करत असलेल्या शिक्षक  वर्गास हा सुखद धक्काच होता.

कारण शैक्षणिक क्षेत्रात  गुरुजीना त्रास देणे म्हणजे अधिकारी अशी रितच झाली आहे.

गटशिक्षणाधिकारी पी.एस मेमाणे यांनी बालिका दिना निमित्त काठेवाडी शाळेस एक न विसणारी भेट दिली.त्याबद्दल  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य ,मुख्याध्यापिका वर्षाराणी शिंदे ,शिक्षक प्रवीण पारवे यांनी शाळेची मुलगी दत्तक घेतल्याबद्दल मेमाणेसाहेबांना धन्यवाद दिले.