डॉ.लहू गायकवाड यांना बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार जाहीर

 जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील प्रा.डाँ.लहू गायकवाड यांना बेस्ट इनोव्हेटिव्ह टिचर पुरस्कार जाहिर करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दर वर्षी संशोधन अणि चौकटी बाहेरचे कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना 'बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर' हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येत असते.    २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. (दि. २६)जानेवारी २०१९ रोजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांनी आपल्या भाषणा मध्ये हा पुरस्कार, नारायणगाव येथील  ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विषयाचे शिक्षक, 'प्रा.डॉ. लहू कचरू गायकवाड' यांना  पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

 डॉ.गायकवाड हे इतिहासाचे अभ्यासक, संशोधक व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.जुन्नर तालुक्याच्या इतिहासाला त्यांनी संशोधनातून मोठे स्थान प्राप्त करून दिले आहे.

 डाँ.प्रा.लहू गायकवाड  यांना पुरस्कार  जाहीर झाल्याने ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव च्या शिरपेचात,पुन्हा एकदा मनाचा तुरा रोवला गेला.असल्याचे प्राचार्य शेवाळे  यांनी मत व्यक्त केले. डॉ लहू गायकवाड यांचे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष  कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच  त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.