शिवा रावच्या उमेदवारीसाठी युवक कॉंग्रेसचे वरिष्ठांकडे साकडे

 ललित लांजेवार:

लोकसभेतील पराभवानंतर आगामी २०१९ मध्ये काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. युवक काँग्रेसमधील नव्या युवा चेहऱ्यांना थेट लोकसभा व विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची योजना आखली असून आता जिल्ह्यातील कार्यकर्ते आप आपली फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. 

बुधवारी निवडणुक मंडळाची बैठक इंटक भवन, चंद्रपूर येथे पार पडली.सदर बैठकीला चंद्रपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष शिवाराव यांनी मुलाखत दिली. दरम्यान चंद्रपूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी घेतलेल्या ठरावाच्या प्रत निवडणुक मंडळाकडे देण्यात आली. व युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्रजी यादव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना पाठविण्यात आली.

या ठरावामध्ये मागील ८ वर्ष युवक कॉंग्रेसची धुरा शिवा राव यांनी चांगल्या प्रकारे सांभाळली व संपुर्ण लोकसभा क्षेत्रात युवक कॉंग्रेस बळकट केली व २० वर्षापासुन NSUI व युवक कॉंग्रेसच्या विविध पदावर सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. व युवक कॉंग्रेसला समोर नेण्यात शिवा राव यांचा मोलाचा वाटा आहे,त्यामुळे यांना लोकसभेची उमेदवारी दयावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी केली.

.सदर निवडणुक मंडळात आ. वजाहद मिर्झा जिल्हा अध्यक्ष यवतमाळ, चंद्रपूर जिल्हा प्रभारी किशोर गजभिये, जिल्हा प्रभारी अतुल लोंढे,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे,शहर अध्यक्ष नंदु नागरकर, माजी आ. वामनराव कासावार, माजी आ. अविनाश वारजुरकर, शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष हरिश कोत्तावार, प्रदेश सचिव सचिन कत्याल, प्रदेश सचिव रूचित दवे,जिल्हा महासचिव इमरान खान, जिल्हा महासचिव सोहेल शेख,चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, राजुर विधानसभा अध्यक्ष एजाज अहेमद, वरोरा विधानसभा अध्यक्ष सतिश वानखेडे, बल्लारपूर विधानसभा उपाध्यक्ष आकाश अंदेवार,जिल्हा सचिव सुरज कन्नुर,अजय चिन्नुरवार घुग्गुस शहर अध्यक्ष तौफीक शेख,आदी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आदी उपस्थित होते.