नागभीड रेल्वे स्टेशनला स्मार्ट स्टेशनचा दर्जा द्या:संजय गजपुरे

चंद्रपूर/प्रतिनिधी:

नागभीड रेल्वे स्टेशनवर दक्षिण पुर्व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री एस.एस.स्वाईन यांचे डीआरयुसीसी रेल्वे सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी स्वागत करुन विविध मागण्या व समस्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. महाप्रबंधकासमवेत मंडल रेल प्रबंधक श्रीमती शोभना बंदोपाध्याय , वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव , अप्पर मंडल रेल प्रबंधक वाय.एच.राठोड ,वरिष्ठ मंडल अभियंता ए.के.सुर्यवंशी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी गडचिरोली लोकसभेचे खासदार अशोकभाऊ नेते यांनीही रेल्वे विश्रामगृहात महाप्रबंधकांची भेट घेऊन विशेषत: नागभीड -नागपुर व गडचिरोली - वडसा ब्राॅडगेज या रेल्वे मार्गाबाबत सद्यस्थिती अवगत केली व लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट केले. या चर्चेत ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या अंडरग्राऊंड पुलिया मुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत संजय गजपुरे यांनी माहिती देऊन यावर उपाय करण्याबाबत विनंती केली. 

याप्रसंगी माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर , भाजपा नागभीड तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम , नागभीड नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सचिन आकुलवार , नगरसेवक रुपेश गायकवाड व दशरथ उके , पत्रकार संघाचे घनश्याम नवघडे , राजेश झाल्लरवार , अरुण गायकवाड तसेच भाजपाचे परेश शहादानी , धनराज बावणकर , विनोद गिरडकर , जगदिश सडमाके , गुरुदेव नागापुरे ,रमेश फुलझेले ,तसेच रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य तसेच सामाजिक व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रेल्वे पोलिसांकडुन महाप्रबंधकांना मानवंदना देण्यात आली. रेल्वे स्टेशन ची पाहणी केल्यानंतर परिसरात असलेल्या आकर्षक बगिच्याचे निरिक्षण करुन नवनिर्मित फवाऱ्याचे लोकार्पण केले.याप्रसंगी नागरिक व रेल्वे प्रवाशांनी चांगलीच गर्दी केली होती.