ताजुद्दीन बाबावर तामिळमध्ये पुस्तक

नागपूर- तामिळनाडू च्या चेन्नई निवासी श्रीमती रमा देवी* यांनी *महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट च्या सहकार्यांने *श्री. संत ताजुद्दीन बाबा च्या जिवनावर आधारित तामिळ भाषेतील पुस्तकं प्रकाशित केले.

             या पुस्तकाताचे विमोचन पाचवे *श्रीमंत राजे रघूजी महाराज भोंसले,* व महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष *श्रीमंत डाॅ. राजे मुधोजी महाराज भोंसले* च्या हस्ते झाले. आमदार निवास च्या सभागृहात पार पडलेल्या या विमोचन सोहळ्यास उद्योजक *श्री. टी. व्ही. श्रवण कुमार* मुख्यअतिथी म्हणून तर तामिळनाडू च्या प्रख्यात लेखिका *श्रीमती इंदुमती देवी* व शेगांव संस्थानचे हिंतसिंचक *श्री. रमेश गट्टानी*  अतिथी म्हणून उपस्थित होते.

   या समारोहाचे सुत्र संचालन प्रख्यात उद्योजक *श्री. ललित सुद* व महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट चे प्रसिद्धी प्रमुख *श्री. सारंग ढोक* यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे सदस्य *श्री. गजानन कावळे* नी केले.