महादुला नगर पंचायत निवडणुकासाठी १०९ उमेदवाराचे नाम निर्देशन पत्रे

अनिकेत मेश्राम/ कोराडी नागपुर:

कामठी तालुक्यातील महादुला नगर पंचायतची  निवडणूक 27 जानेवारी होऊ घातलेल्या   या निवडणुकीत अनेक दिगंज रिगणात  उतरले असुन यामुळे येथील प्रत्येक लढत रंगतदार होणार  असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
महादुला नगर पंचायतच्या  निवडणुकीसाठी आतापर्यंत १०९  उमेदवारी अर्ज दाखल  झालेले आहे यात   नगराध्यक्षपदासाठी पदासाठी  ९ अर्ज दाखल झाले  असुन यात भाजप कॉंग्रेस बसपा  व शिवसेना या प्रमुख  राजकीय  पक्षाच्या उमेदवाराच्या समावेश  आहे तसेच  १६ प्रभागांतून  नगरसेवकासाठी  १०० उमेदवारांनी  आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 

भाजपच्यावतीने अध्यक्ष पदासाठी राजेश रंगारी  कॉंग्रेसतर्फे  रत्नदीप रंगारी बसपा तर्फे चिरकूट वासे व अमित सरोदे शिवसेना कडून पकज सौयॅ  याच्यासह ४ अपक्ष उमेदवारांनी अर्ज सादर केले अपक्षामध्ये प्रेम कुमार गजभरे, सुनील साळवे,विलास तभाने ,पवन  पखिडे  यांचा समावेश  आहे निवडणुक कार्यक्रमानुसार १० जानेवारी रोजी अर्जांची  तपासणी होईल त्यानंतर योग्य उमेदवारी यादी  जाहीर केली जाईल
यात आपला उमेदवारी अर्ज परत घेण्याची  मुदत १७ जानेवारी २०१९ पर्यंत आहे १८ जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येईल  त्यानंतर  खऱ्या  अथ्याने  निवडणुकीचा  माहोल गरम  होणार आहे महादुला नगर पंचायत निवडणुक अंत्यत  प्रतिशित मानली जात आहे या मुळे या निवडणुकीकडे  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले  आहे.