मलठणमधील सावित्रीच्या लेकींची थांबली पायपीट

महिला व बालकल्याण विभागाकडुन विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप
अण्णापूर - पुणे (प्रतिनिधी ) 

वाडीवस्तीवरुन पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिंनीकरीता पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सायकल वाटप केले जाते. यावेळी मलठण ( ता.शिरुर )येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तेरा विद्यार्थिंनींना नुकतेच जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. दरम्यान या सायकली मिळाल्यामुळे सावित्रीच्या या लेकींची शिक्षण घेण्यासाठी होणारी पायपीट थांबली असुन नव्या उत्साहाने व उमेदीने त्या शाळेत येणार आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुनिताताई गावडे यांच्या निधीतुन मंजुर झालेल्या येथील अंगणवाडी इमारतीचे भुमिपुजनही करण्यात आले. यावेळी शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वासआबा कोहकडे, जिल्हा परीषद सदस्य सुनिता गावडे, पंचायत समिती सदस्य डाॕ. सुभाष पोकळे, मलठणचे सरपंच सुहास थोरात, माजी सरपंच कैलास कोळपे, पोलिस पाटील अर्चना थोरात, केंद्र प्रमुख रामदास बोरुडे, मुख्याध्यापक पाटीलबा मिडगुले, तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित पदवीधर शिक्षक सुभाष जाधव, तंत्रस्नेही शिक्षिका रेखा पिसाळ, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष संपत गायकवाड, प्रकाश गायकवाड, दत्ता गायकवाड, संदीप गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते मुकुंद नरवडे, ग्रामसेवक विलास शिंदे, शिक्षक नेते अॅड. युवराज थोरात, नामदेव दंडवते, सुदाम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांचेसह अनेक ग्रामस्थ व पालक उपस्थित होते 
या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक पाटीलबा मिडगुले , सुत्रसंचालन शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मानसी थोरात, यांनी तर आभार संतोष दंडवते यांनी मानले.