नेत्यांनी घेतली बैठक; कार्यकर्ते प्रफुल्लित

khabarbat.inराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बूथ कमिटी सदस्यांची बैठक

मनोज चिचघरे/भंडारा प्रतिनिधी

पवनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बूथ कमिटी सदस्यांची बैठक बाजार समितीच्या पठागंणात आयोजित करण्यात आली होती. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जवळजवळ दोन तास राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जबरदस्त फिरकी घेतली. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मा, खासदार प्रफूल्ल पटेल यांनी भाषण न करता प्रत्येक गावातील व प्रभागाती बूथ कमिटी सदस्यांची कार्यशाळा घेऊन त्याच्याशी संवाद साधला. 

या मोदी सरकारला पूणा बळी पडू नका असे आवाहन प्रफूल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले,

पवनी तालुक्यातील बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने खासदार प्रफूल्ल पटेल व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष लोमेश भाऊ वैद्य यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. 

यावेळी मंचावर उपस्थित मा, नाना पंचंबूध्दे,  मा, धनंजय दलाल, महिला अध्यक्ष कल्याणी भुरे, विवेकानंद कूझेँकर, पंढरीनाथ सावरबांधे, विजय ठवकर, हिरालाल खोब्रागडे, सुनंदा मुंडले, किशोर पालांदूरकर, तालुका अध्यक्ष लोमेश वैद्य, तोमेश पंचभाई, यादव भोगे, नगरसेवक सानु बेघ, शोबना गौरशेटीवार, छोटू बाळबूधे, मनोरथा जांभुळे ,शैलेश मयूर पवनी तालुक्यातील एकूण १६५ बूथ असून पवनी येथे २४ तर अड्याळ येथे १० बूथ असून पंचायत समिती सर्कलमध्ये १४ बूथ आहेत.

कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष लोमेश वैद्य यांनी केले,  तर आभार  तोमेश पंचभाई यांनी केले.