आमदार निवासाच्या लिफ्ट मध्ये अडकले पत्रकार


नागपूर : आमदार निवास येथील लिफ्ट 'हँग' झाल्या मुळे या लिफ्ट मध्ये दोन पत्रकार अडकले होते. भीमराव लोणारे, दिनेश घरडे असे लिफ्ट मध्ये अडकलेल्या दोन पत्रकारांची नावे असून ते चक्क दहा मिनिट लिफ्टच्या आतच गुदमरत राहले.

आमदार निवास येथील इमारत क्रमांक १ च्या तिसऱ्या माळ्यावर रविवार (२० जानेवारी) रोजी शिक्षकांचे अधिवेशन होते. या अधिवेशनाची वृत्तसंकलना साठी IBMTV9 NEWS पोर्टल चे पत्रकार भीमराव लोणारे व मिशन इंडिया न्यूज पोर्टल चे पत्रकार दिनेश घरडे दुपारी ३ वाजताच्या सुमारास आमदार निवास येथील इमारत क्रमांक १ च्या उजव्या भागाच्या लिफ्ट मध्ये चढले व लिफ्टचा दरवाजा बंद झाला. त्यांनी तिसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी ३ क्रमांकाची बटन दाबली. मात्र लिफ्ट वरती न जाता ती जागेवरच अडकून राहली. तब्बल १० ते १५ मिनिट हे दोन्ही पत्रकार या लिफ्ट मध्ये अडकून राहले. बंद लिफ्टच्या आत मधून दोन्ही पत्रकारांनी लिफ्टचा दरवाजा जोरजोरात खटखटावला पण या लिफ्टच्या बाहेर असलेले कर्मचारी मात्र धाऊन आले नाही. भाजपच्या एक कार्यकर्ता धाऊन आला. त्याने बाहेरुन लिफ्ट ची बटन दाबली व लिफ्टचा दरवाजा उघडला अन दोन्ही पत्रकारांनी सुटकेचा श्वास घेतला. घटने संदर्भात आमदार निवास स्वागत कक्ष कर्मचारी अनिल कोरेवार यांना माहिती दिली असता कोरेवार यांनी म्हटले 'मी काय करु, लिफ्ट मेन्टनंस माझ्या कडे नाही, तुमचा जीव वाचलाना', असे संताप जनक उत्तर या स्वागत कक्ष कर्मचाऱ्याचे होते. गेल्या २४ तासा पासून लिफ्ट 'हँग' झालेली असताना ही येथील कर्मचाऱ्यांनी 'या लिफ्टचा वापर करु नका' असे फलक ही लावले नव्हते. ही गंभीर घटना घडल्या नंतर आमदार निवास चे कार्यकारी अभियंता टेंभूर्णे यांनी लिफ्टच्या समोर फलक लावले. या घटने वरुन लक्षात येते की आमदार निवास येथे कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यावर किती तत्पर आहेत. कर्मचाऱ्यांवर कुठल्याच अधिकाऱ्याचे वचक नसल्याने ते बेजबाबदार पणे वागत आहेत.