ब्रम्हपुरी महोत्सवात आ.वडेट्टीवार यांनी केला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

चंद्रपूर/प्रतिनिधी:  

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ब्रम्हपुरी येथे ब्रम्हपुरी महोत्सवाची सुरुवात १७ जानेवारी पासून झालेली असून हा कार्यक्रम २० जानेवारी पर्यंत चालणार आहे. या चार दिवसीय ब्रम्हपुरी महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज दि. शेवटच्या दिवशी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी येथे चालु असलेल्या ब्रम्हपुरी महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने मारोतरावजी कामडे साहेब, अतुळजी लोंढे प्रवक्ते, देवीदासजी जगनाळे सर, गोविंदरावजी भेंडाळकर, खेमराज तिडके तालुकाध्यक्ष, रिताताई उराडे नगराध्यक्ष, हितेंद्र राऊत शहर अध्यक्ष, राजेश कांबळे जी. प. सदस्य, प्रमोद चिमुरकर जी. प. सदस्य, विलास विखार गटनेते न. प. ब्रम्हपुरी, लताताई संजय ठाकूर नगरसेविका, निलिमताई सावरकर नगरसेविका, सुनीताताई तिडके नगरसेविका, सरिता ताई पारधी नगरसेविका, महेश भर्रे नगरसेवक, प्रीतिष बुरले नगरसेवक, प्रतिभाताई फुलझेले महिला शहर अध्यक्ष, संजय ठाकूर माजी नगरसेवक, व इतर पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.