मल्टी ऑरगॅनिक्स विरोधात राजेश बेले यांचे आमरण उपोषण सुरू

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर MIDC मधील मल्टी ऑरगॅनिक्स कंपनीची मुजोरी बंद होत नसल्याने प्रशासनाने लक्ष देऊन कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यासाठी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष राजेश बेले व चंद्रपुरातील पर्यावरण प्रेमींना सोबत घेऊन दि.१५/१/२०१९ पासुन आमरण उपोषण सुरू आहे.चंद्रपूर MIDC मधील मल्टी ऑरगॅनिक्स कंपनी द्वारे दाताडा नाला व वन जमिनीवर टाकण्यात येत असलेल्या रासायनिक द्रव्यामुळे परिसरातील सहा गावातील भूजल साठा प्रदूषित झाला आहे. या रासायनिक द्रव्यांमुळे नदीचे पाणी दूषित झाले असून याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पोलीस विभाग व वन विभागाकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नाही. असा आरोप करण्यात आला आहे.
या उपोषणादरम्यान मल्टी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात यावे. लहुजी नगर येथे पाईपलाईन टाकून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्यांच्या संपत्तीची चौकशी करून निलंबित करावे. जिल्‍हाधिकारी यांनी सदर कंपनीविरुद्ध प्रदूषणावर उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करावी सुरेश चोपणे यांचे केंद्रीय पर्यावरण समिती व समितीचे सदस्य करावे प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी पर्यावरण तज्ञांची समिती गठीत करावी.तसेच सदर कंपनीचे पर्यावरण संबंधीचे चौकशी करण्यात यावी. या मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत.
या आमरण उपोषणाला मंगळवारी सकाळी १ वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष मा.सूरज चव्हाण आणि सुशांत दुर्योधन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष मा.श्री.नितीन भाऊ भरटकर सागर जोगी नितिन पिंपळशेंडे, सोनल ठोपटे, नितिन गाडगे, शिवसेनेचे संदीप गिरी, प्रमोद पाटील, विवेक बारसिंगे, निलेश हिवराळे,ई कार्यकर्ते यांनी अमारण उपोषण मंडपाला भेट दिली.