औद्योगिक विकासापासून पवनी तालुका कोसो दूर:युवाशक्ती

पवनी/मनोज चिचघरे:

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा त्वरित विकास करून येथील जागा नवउद्योजकांना त्वरित वाटप कराव्यात,या क्षेत्रात औद्योगिक पायाभूत सुविधा व दळणवळणच्या सुविधा निर्माण करण्यात याव्यात अशी मागणी युवाशक्ती संघटना, तालुका - पवनी यांनी मा मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य यांना केलेल्या निवेदनातून केलेली आहे.

भंडारा शहरापासून 45 किमी अंतरावर असलेल्या पवनी तालुक्यात एमआयडीसी ची स्थापना मागील 10 ते 12 वर्षांपासून झालेली आहे.मात्र अनेक वर्षे होऊनही त्याठिकाणी उद्योगधंदे सुरू झाले नसल्याने पवनी तालुका विकासाला गतिरोध मिळण्याची विदारक चित्र दिसून येत आहे.

पवनी तालुक्यात पवनी गावापासून फक्त 4 ते 5 किमी अंतरावर अनेक वर्षांपासून एमआयडीसी स्थापन झालेली आहे.अशा एमआयडीसी चा उपयोग उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी भाडेतत्वावर जागा दिली जात असते. जेव्हा एमआयडीसी उभारण्यात आली तेव्हा शेकडों एकर जमीन शासनाला दिली.त्यावेळी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा अल्पशा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला.जमिनी गेल्या तरी आपल्या तालुक्यात उद्योग धंदे सुरू होतील या आशेने पवनी तालुक्यातील बेरोजगार युवकांना आपल्याच एमआयडीसी मधून रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती.मात्र मागील कित्येक वर्षाचा कालखंड उलटून देखील अद्यापही एक ही उद्योग या एमआयडीसी क्षेत्रात सुरू झालेले नाही.

वास्तविक पाहता ज्या जिल्यातील तालुक्यामध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळाली,त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत.परंतु जिथे उद्योग निर्माण झालेले नाही त्याठिकाणी बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळू शकली नाही.यामध्ये विदर्भातील पवनी तालुक्याचा उल्लेख करता येईल.

भंडारा जिल्यातील पवनी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा त्वरित विकास करून येथील जागा नवउद्योजकांना त्वरित वाटप कराव्यात,या क्षेत्रात औद्योगिक पायाभूत सुविधा व दळणवळणच्या सुविधा निर्माण करण्यात याव्यात अशी मागणी युवाशक्ती संघटना, तालुका - पवनी यांनी मा मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य यांना केलेल्या निवेदनातून केलेली आहे.

निवेदन श्री मनोहरजी आकरे,सदस्य,पंचायत समिती पवनी यांचे नेतृत्वाखाली आणि श्री देवराज बावनकर यांचे अध्यक्षतेखाली देण्यात आले.निवेदन देतांना युवाशक्ती संघटना,तालुका पवनी चे श्री मच्छिंद्र हटवार, श्री गोपाल काटेखाये,श्री प्रशांत मोहरकर,श्री राहुल नंदनवार,श्री दीपक बावनकर, श्री वैभव काटेखाये,श्रीअंकुश सावरकर, श्री छोटू बावनकर, श्री राकेश हटवार,श्री प्रताप मोहरकर, श्री तेजस मोहरकर,श्री किशोर जिभकाटे,श्री गणराज बावनकर तसेच श्री योगेश बावनकर, भंडारा जिल्हा समन्वयक,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.