मेट्रोच्या मासिक प्रवासी दरात मिळावी सवलत


khabarbat.in

धावणार माझी मेट्रो कार्यक्रमात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मागणी

 

नागपूर : लवकरच महा मेट्रो नागपूरची प्रवासी सेवा नागरिकांसाठी सुरु होणार आहे. सीताबर्डी स्थित मुंजे चौक मेट्रो जंक्शन ते खापरी मेट्रो स्टेशन आणि सुभाष नगर मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन पर्यंत एकूण १८ किमीसाठी मेट्रो धावणार आहे. तेव्हा ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी मेट्रोतून प्रवास करावा यासाठी विविध उपक्रम महा मेट्रोतर्फे राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने हिंगणा एमआयडीसी'च्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवार दिनांक२५ जानेवारी रोजी धावणार माझी मेट्रो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

 

कार्यक्रमाच्या निमित्याने मेट्रोच्या मासिक प्रवासी दरात सवलत देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडे केली. तसेच महा मेट्रो नागपुर प्रकल्पात आकर्षणाचे केंद्र असलेल्या व्हर्टिकल गार्डन महिंद्रा कंपनीच्या गेट समोर असलेल्या मेट्रो पिलरवर लावण्याचा आग्रह अधिकाऱ्यांनी केला. कार्यक्रमात प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. फिडर सेवाचा आणि सायकलई-वाहनांचा उपयोग नागरिकांनी ज्यास्तीत ज्यास्त करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रवासासाठी मेट्रोचा वापर केल्याने प्रदूषणावर कस मात करता येईल तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी झाल्यास रस्ते अपघातांवर कस नियंत्रण आणता येईल यावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

उल्लेखनीय म्हणजे या कार्यक्रमात#धावणारमाझीमेट्रो कॅम्पेन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी खास आकर्षणाचे केंद्र ठरले. 

महिंद्रा कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेट्रोच्या#धावणारमाझीमेट्रो विश वॉलवरून महा मेट्रोला शुभेच्या दिल्या. महा मेट्रो राबिवत असलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची प्रशंसा त्यांनी केली. तसेच सजेशन फॉर्मच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपल्या सूचना/इच्छा महा मेट्रोपुढे व्यक्त केल्या. कार्यक्रमात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या विविध विभागातील व्यवस्थापकअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.