चंद्रपूरचे कट्टर शिवसैनिक रमेश तिवारी यांचे निधनचंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक माजी सहसंपर्क प्रमुख रमेश तिवारी यांचे नागपूर येथील खाजगी 
रुग्णालयात रविवारी निधन झालं, गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्वचेच्या कर्करोगाने ग्रासले होते.
मागील काही दिवसांपासून त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती होते. 
मागील २ दिवसांपासून स्वसनाचा जास्तच त्रास वाढला होता.त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र रविवारी डॉक्टरांना तपसणी दरम्यान त्यांची प्रकृती साथ देत नसल्याचे समजले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सध्या चंद्रपूरात सर्वत्र त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली जात असून त्यांना चंद्रपुर येथे आणले जाणार आहे. ही दुःखद वार्ता शहरात पोहचताच शिवसैनिकात शोककळा पसरली.त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेला वाढीसाठी मोलाचे कार्य केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणत देखील तिवारी यांनी आपली छाप सोडली होती.रमेश तिवारी हे महाराष्ट्र राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अतिशय निकटवर्तीय होते.त्यांच्या जाण्याने शिवसेनेन एक सच्चा कार्यकर्ता गमावला आहे.रमेश तिवारी गेली 30 वर्ष शिवसेनेत काम करत होते, त्यांनी शिवसेनेत किसान सेना उपजिल्हा प्रमुख, उप शहर प्रमुख, उप जिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, नंतर जिल्हा सह संपर्क प्रमुख पदावर काम केले होते.