वाडीत ईव्हीएम व व्हीव्ही पॅडबाबत जनजागृती

 वेळ कमी पडत असल्याचा नागरीकांचा आक्षेप 
नागपूर/अरूण कराळे:

लोकसभा निवडणुकीचे राजकीय क्षेत्रात वारे वाहू लागले असतांनाच निवडणुका निष्पक्ष व दोषपूर्ण पद्धतीने व्हाव्यात, या दृष्टीने भारतीय निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार मतदारात ईव्हीएम मतदार यंत्र व त्यासोबत नव्यानेच संलग्न राहणारे व्हीव्हीपॅड या कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष नागरिकांना दाखविण्यासाठी वाडी परिसरात असलेल्या ९ मतदार केंद्रावर असलेल्या ५५ मतदार मतदान केंद्रावर प्रात्यक्षिक सुरू झाले आहे .

 मंगळवार १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ५ वाजता पर्यत मतदान कक्ष क्र.८७ ते ९३ टेकडी वाडी जि. प. शाळा या केंद्रापासून प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी ११ ते २ प्रगती कन्या विद्यालय, दुपारी ३ ते ५ जि. प. शाळा वाडी, १७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते २ जि. प. शाळा वाडी व दुपारी ३ ते ५ ला इंद्रायणी नगर येथील लोकमान्य टिळक शाळा, २५ जानेवारीला रोजी सकाळी ११ ते २ विमलताई तिडके विद्यालय, दुपारी ३ ते ५ दत्तवाडी येथील जिंदल पब्लिक स्कूल, २८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ दत्तवाडी येथील जिंदल पब्लिक स्कूल, तर दुपारी २ ते ५ ला दत्तवाडी येथील शिलादेवी पब्लिक स्कूल, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ ला शिलादेवी शाळा व ब्लु बेल्स दत्तवाडी या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखविणे सुरू राहील टेकडी वाडी जि.प.शाळेत मंडळ अधिकारी धनराज मोहरकर, तलाठी संकेत बांबोडे, गीता कुंभारे, संजय हेलोंडे, भास्कर धोपटे यांनी प्रत्यक्ष नागरिकांना मतदान यंत्र व व्हि.व्हि.पि.ए.टी यंत्रावर मतदान करुन नागरिकांना माहिती सह जनजागृती केली.यावेळी नागपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कोकाटे, बी.एल.ए. बादल कुंभरे, अनामिका पाटील, सविता पाटील, अजयकांत मेश्राम, गोपाळ वरठी,तलाठी कर्मचारी रवी फाले,न.प.कर्मचारी रमेश कोकाटे इत्यादींनी प्रत्यक्ष या यंत्रावर मतदान करुन शंकेचे समाधान केले.

 परंतु या व्हि.व्हि.पि.ए.टी यंत्रावर फक्त ७ सेकंदातच आपले मत कुणाला गेले हे पाहण्याची सुविधा असल्याने वेळ कमी पडुन मतदारात गोंधळ होण्याचे प्रकाश कोकाटे यांनी मतदार अधिकाऱ्यांचा लक्षात आणून देऊन ही वेळ वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मतदारांनी वेळापत्रकानुसार मतदार केंद्रावर या प्रत्यक्षिकासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले