पवनी अ.भा.वि.प तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा

मनोज चीचघरे/पवनी:


अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा पवनी तर्फे "सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा" शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी येथे आयोजित करण्यात आली होती .त्यात एकूण 94 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे विदर्भ प्रांत सहमंत्री तसेच भंडारा जिल्हा संयोजक योगेश बावनकर, विदर्भ प्रांत कार्यकारनी सदस्य अखिल मुंडले, नगर सहमंत्री उल्हास सावरकर, महाविद्यालयीन प्रमुख आकाश हटवार, सौरभ सावरकर, कपिल मेश्राम, नीलेश मोहरकर, आशिक वाघधरे, अमित खोब्रागडे, सूरज अवसरे, दीपक बनारसे, अमोल लांजेवार, अमोल जीभकाटे, निशांत शिवरकर, भावेश खांदाडे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.