चंद्रपूर:भीषण अपघातात २ ठार १६ जखमी

Two killed and 15 injured in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटून दोन ठार, १५ जखमी ललित  लांजेवार:
मूल तालुक्यातील चिखली कन्हाळगाव मार्गावर लग्न घरची मंडळी घेऊन जात असलेला ट्रॅक्टर उलटल्याने २ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. सावली येथील मारोती लक्ष्मण शेंडे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने जेवणाच्या कार्यक्रमासाठी सिंदेवाही तालुक्यातील जामलाई ग्रामदैवताला जात होते.त्यावेळी हा अपघात घडला. यात चंदू रस्से (१६) व बोळल निकुरे (४०) रा. सावली यांचा जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीनचे नाव आहे. तर ट्रॅक्टरमधील इतर १६ जण जखमी झाले.सुखदेव वाढई, देव शेंडे, अनुराग वाढई,  आनंदराव चौधरी जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.तर मनोहर निकुरे, तुकाराम गावतुरे, अशोक वाढई, दिपक मोहुर्ले, रंजन मोहुर्ले, मयुर मोहुर्ले, गणपत ठाकरे, सुभाष शेंडे बंडू शेंडे हे किरकोळ जखमी असून मूल उपजिल्हा रूग्णालयात भरती आहेत. ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्याने व चालकाचे त्यावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असे सांगण्यात येत आहे.  तर मनोहर निकुरे, तुकाराम गावतुरे, अशोक वाढई, दिपक मोहुर्ले, रंजन मोहुर्ले, मयुर मोहुर्ले, गणपत ठाकरे, सुभाष शेंडे बंडू शेंडे हे किरकोळ जखमी मूल उपजिल्हा रूग्णालयात भरती आहेत.