उत्कृष्ट अध्यापना बद्दल महावितरणचे PRO योगेश विटणकर यांचा गौरव

नागपूर/प्रतिनिधी: 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2018-19 मध्ये घेण्यात आलेल्या ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण वर्गात उत्कृष्ट अध्यापन केल्याबद्दल कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे यांच्या हस्ते प्रादेशिक कार्यालय नागपूरचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश नरहरी विटणकर यांचा गौरव करण्यात आला. 
राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते झालेल्या या कार्यक्रमात हा अभ्यासक्रम यशस्विरित्या पुर्ण करणा-या नागपूर जिल्ह्यातील 153 प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, नागपूर जिल्हा विदुयत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख, कामठी तालुका विदुयत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल, ग्राहक सल्लागार गौरी चंद्रायण, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, नागपूर जिल्हा परिषद सभापती उकेश चव्हाण, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, मनीष वाठ, विदुयत निरीक्षक उमाकांत धोटे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे सहायक संचालक प्रवीण खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.