महावितरणच्या शिकाऊ उमेदवार यादीत घोळ;आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप

ITI विध्यार्थी धडकले महावितरण कार्यालयावर


ललित लांजेवार/नागपूर
चंद्रपूर येथील महावितरण तर्फे काढण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवार यादीत आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शनिवारी ITI उतीर्ण व शिकाऊ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली या यादीवर अनेकांनी आक्षेप घेत महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

यानंतर सोमवारी मनसेच्या महिला शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकूर यांच्या नेतृत्वात शेकडो विध्यार्थी महावितरण कार्यालयावर धडकले,या वेळी महावितरण कार्यालय चंद्रपूर येथील विद्युत भवन येथे ITI उतीर्ण विध्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवार भरतीची यादीला घेवून चांगलाच गोंधळ उळाला. जाहीर करण्यात आलेल्या यादीत कमी टक्केवारी असलेल्या अनेक विध्यार्थ्यांचा या यादीत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या विध्यार्थ्याना६० -६५ टक्के आहेत अश्या विध्यार्थ्यांचे या यादीत नाव आले आहे, मात्र ७०-८० टक्के हून अधिक असणाऱ्या या विध्यार्थ्यांचे नाव यादीत नसल्याने विद्यार्थ्यांनी चंद्रपूर अधीक्षक अभियंता अशोक मस्के यांच्या कार्यालयात गोंधळ घातला.
 हि संपूर्ण यादी तयार करतांना विद्यार्थ्यांकडून २० हजारा पासून ते ६० हजारापरीयंत एका उमेदवारासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचे विद्यार्थ्यात कुजबुज सुरु आहे. सोमवारी विद्यार्थ्यांनी अधीक्षक अभियंता अशोक मस्के यांना संपूर्ण टक्केवारी नुसार लावल्या गेलेल्या यादीचा तपशील मागितला,त्यात कमी टक्केवारीच्या विध्यार्थ्यांचे नाव असल्याचे समोर आले .त्यामुळे लवकरच सुधारित यादी लावण्याचे लेखी आश्वासन यावेळी विध्यार्थ्यांना देण्यात आले, महावितरणात सुरु आल्याचे या काळ्या कारभारात कोण कोणत्या अधिकाऱ्यांचे खिसे गरम झाले आहेत,व वरिष्ठ अधिकारी यांचेवर काय कारवाई करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.