घरघुती वादावरून पतीचा पत्नीवर चाकू हल्ला

पवनी/ मनोज चिचघरे:

घरगुती वादामुळे पतीने आपल्याच पत्नीला चाकूने डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पवनी येथील शुक्रवारी वार्ड येथे घडली.

जयश्री सुनील रंगारी, ३७ वय असे जखमी पत्नीचे नाव आहे,आरोपीने पत्नीला चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न केला,पोलिसांनी आरोपी सुनील प्रकाश रंगारी  वय ४०वर्षे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे,

जखमीच्या आई विश्रांती हरिदास मेश्राम, रा.सावली जिल्हा चंद्रपूर यांचा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, जखमींला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी भादंवि कलम ४९८ऐ ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला,पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू करण्यात आहे.