नुकसान ग्रस्त शेत पिकांची आमदार किशोर जोरगेवार यांचे कडून पाहणीतात्काळ पंचनामे करुन सरसकट नुकसान भरपाई द्या - नुकसान ग्रस्त शेत पिकांची आमदार किशोर जोरगेवार यांचे कडून पाहणी

परतीच्या पावसाने शेतक-यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाल्याने जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. शेतक-यांच्या मदतीसाठी नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार समोर आले असून त्यांनी आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात जाऊन शेतपिकांची पाहणी केली. यावेळी नूकसानग्रस्त शेत पिकांचे🌾तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या असून प्रति हेक्टर २५ हजार रुपयांचा मोबदला देण्याची मागणी जोरगेवार यांनी केली...