विनायक लिंगायत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानितविनायक लिंगायत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित                                                      गडचिरोली :                                                            मुलचेरा येथिल पंचायत समिती शिक्षण विभाग गट साधन केंद्रात विषय साधन व्यक्ती या पदावर कार्यरत असलेले विनायक रामदास लिंगायत यांना नुकतेच औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                                         बोधी ट्री एज्युकेशन फौंडेशन व जीवन सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या शासन मान्य संस्थेद्वारा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत राज्यातून द्वितीय क्रमांक विनायक रामदास लिंगायत यांनी पटकावला. त्यांनी " आजचे शिक्षण आणि शासनाची भुमिका " या विषयावर निबंध लेखन केले. त्यासाठी त्यांना राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा जीवन गौरव पुरस्कार देवून तापडिया नाट्य मंदिर औरंगपुरा, औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सपत्नीक 13 जानेवारी 2 020 ला गौरविण्यात आले. शाल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व जीवन गौरव मासिक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवारामध्ये व सर्वत्र अभिनंदन होत आहे.