अमरावती येथे नाभिक समाजाचा विदर्भ स्तरीय कार्यकर्ता, उपवधु - वर परिचय मेळावा!


अमरावती येथे  नाभिक समाजाचा  विदर्भ स्तरीय कार्यकर्ता, उपवधु - वर परिचय मेळावा!

चंद्रपूर -  महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अमरावती द्वारा आयोजित नाभिक समाजाचा विदर्भस्तरीय कार्यकर्ता व उपवधू- वर परिचय मेळावा दिनांक 25 जानेवारी 2020 वेळ सकाळी 9 ते तीन वाजेपर्यंत स्थळ वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा मंदिर सभागृह, गाडगे नगर, अमरावती येथे शिवरत्न जीवबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट ,अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय  कार्यकर्ता मेळावा व वधू-वर  परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. घटनेच्या वाढविस्तारकरिता ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यातील अमूल्य क्षण संघटनेसाठी खर्च केला. समाजासाठी वाहून घेतले त्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान  करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'युवा उदय- 2020'  या स्मरणिकेचे विमोचन करण्यात येणार आहे.  कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रमोदजी गंगात्रे,  अध्यक्ष,  नीलकंठ व्यायाम मंडळ अमरावती,  उद्घाटक माननीय सौ.  सुलभाताई खोडके आमदार विधानसभा अमरावती,  विशेष अतिथी माननीय कल्याणराव  दळे ,  प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ महासंघ महाराष्ट्र राज्य,  माननीय जगदीश भाऊ गुप्ता माजी राज्यमंत्री महाराष्ट्र,  प्रमुख मार्गदर्शक माननीय कुमार काळे सर,  राष्ट्रीय प्रभारी बहुजन क्रांती मोर्चा,  नवी दिल्ली.  प्रमुख प्रमुख उपस्थिती दामोदर राव बिडवे, प्रदेश सरचिटणीस महा.  नाभिक महामंडळ महा. मा.  विलासभाऊ इंगोले,  माजी महापौर म. न. पा. अम.,  राजेशजी मुके,  विभागीय अध्यक्ष,   बारा बलुतेदार महासंघ,  अमरावती. मा.  दिनेशभाऊ बुब.  नगरसेवक. म. न. पा. अम. मा.  शरदराव  पुसदकर, मा.   धनराजभाऊ वलुकार, अध्यक्ष,  नागपूर एकता मंच, नागपूर ,. मा.  राजाभाऊ उंबरकर प्रदेश कार्याध्यक्ष,  परीट धोबी सेवा मंडळमंडळ, मा.  दिलीपराव अकोटकर,  अध्यक्ष जिल्हा सुतार समाज,  समन्वय समिती,  अमरावती.  सौ.  शोभाताई नवलकर,  जिल्हाध्यक्षा,  बलुतेदार महासंघ महिला आघाडी अमरावती. ,  सौ.  दीपाली ताई बेलबागकर,  शहराध्यक्ष,  बारा बलुतेदार महासंघ महिला आघाडी.  सौ.  सुषमाताई नांदुरकर,   अध्यक्षा, अष्टविनायक महिला बचत गट.मा. प्रकाशराव  नागपूरकर,  अध्यक्ष,  आस्था नागरी सहकारी पतसंस्था. मा   सुनीलराव  नांदुरकर,  .मा. शरदराव ढोबळे,  अध्यक्ष,   महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ, महा. मा. डॉ.  राजूभाऊ कनेरकर,  विदर्भ अध्यक्ष,   महाराष्ट्र इलेक्ट्रो होमिओ मेडिकल असोसिएशन. मा.  ज्ञानेश्वरराव कुर्वे,  अध्यक्ष सोनार समाज. मा.  अरुणभाऊ  लवणकर, मा.  राजेंद्रजी वेलणकर,  यांची उपस्थिती राहणार आहे. नाभिक समाजातील उपवर- वधू  यांनी या कार्यक्रमाला उपस्थित  राहून आपल्या उपवर वधूंची नोंदणी करून घ्यावी.  व विदर्भातील  नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील नाभिक समाजातील समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा.  असे आव्हान  आयोजक समिती द्वारा करण्यात येत आहेआहे.