स्वराज टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेने राजमाता आई जिजाऊ यांचा विचार अंगीकारावा - बेबीताई उईके
स्वराज टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेने राजमाता आई जिजाऊ यांचा विचार अंगीकारावा:बेबीताई उईके

चंद्रपूर :-
एकता ग्रामीण व शहरी विकास बहुद्देशीय संस्था च्या वतीने हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या 390 वी जयंती इंदिरानगर येथे साजरी करण्यात आली .राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी छत्रपती शिवजीराजेंच्‍या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले. व सर्वांना शुभेच्छ दिल्या व शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिले पण ते स्वराज टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेने राजमाता आई जिजाऊ यांचा विचार अंगीकारून आपल्याच घरापासून मुलांना चांगले संनस्कlर दिले तर समाजात परिवर्तन होणार असे मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अविनाश वैद्य सुलोचना कर्नेवार पार्वती कामटकर सुमित्रा वैद्य आशा नांनाववरे सुमित्रा नारनवरे सुरेखा ठाकरे सुरेखा भोयर आदी महिलांची उपस्थिती होती.