अती मारहाणीत अशोक पेठे यांची प्रकृती गंभीर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती. भरती करणारे पोलिस मात्र फरार !

जिवती ठाणेदार पुल्लरवार यांची अशोकपेठे यांना बेदम मारहाण,

नातेवाईक व मनसे पक्षाकडून पोलिस अधिक्षक व पोलिस महासंचालकांकडे तक्रार दिली जाणार !

चंद्रपूर/जीवती प्रतिनिधी :दिनचर्या न्युज 

जिल्ह्यात दारूबंदी असली तरी कधी चोरट्या मार्गाने दारूची आयात होत असते तर कधी पोलिसांच्या मदतीने दारू अधिकृतपणे आणली जाते, मात्र असे असले तरी पोलिसांना मात्र दोनही मार्गाने पैसे कमावण्याची नामी संधी असते असाच प्रकार जिवती पोलिस स्टेशन अंतर्गत घडत असून पैसे कमावण्याच्या नादात पोलिसांनी चक्क आरोपीवर गुन्हा दाखल न करता त्याला बेदम मारहाण करून त्याची प्रकृती गंभीर केल्याची धक्कादायक घटना काल जीवती पोलिस स्टेशन मधे घडल्याने आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त माहिती नुसार जीवती पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंध्र सीमेलगत नारपठार येथे जीवती पोलिसांनी ज्यामध्ये राठोड व गोपाल नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अशोक पेठे व नेहरू राठोड यांना अवैध दारू साठा आणताना अटक केली.या दरम्यान नेहरू राठोड यांनी मी दहा हजार रुपये देतो मला सोडून द्या अशी उपस्थित पोलिसांना विनंती केल्यानंतर पोलिसांनी ठाणेदार पुल्लरवार यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली की साहेब नेहरू राठोड दहा हजार रुपये द्यायला तयार आहे काय करू. त्यावर ठाणेदार पुल्लरवार यांनी त्याचेकडून दहा हजार रुपये घ्या आणि त्याला सोडून द्या मात्र अशोक पेठेला पकडून आणा असे फर्मान सोडले .त्यामुळे काल सकाळी 11,30 ला अशोक पेठेला पकडून जीवती पोलिस स्टेशन मधे आणले आणि बेदम मारहाण केली, आणि दिवसभर पोलिस स्टेशनमधे बसवून ठेवले.अशातच बेदम मारहाण झाल्याने व पोटात जेवन नसल्याने तडफडत असलेल्या अशोक पेठेने पोलिसांना विनंती केली की मला दवाखान्यात घेवून चला मात्र त्याच्या त्या विनवणीला दाद न देता पोलिसांनी त्याला तू नाटक करतोस तुला अशीच शिक्षा हवी म्हणून दुर्लक्ष केले होते, परंतु त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी ८,३० ला जीवतीच्या आरोग्य केंद्रात तपासणी करिता नेले असता त्यांनी अशोक पेठेला गडचांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले, तिथे सुद्धा प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या गाडीत आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रात्री १२,०० वाजता भरती केले.
खरं तर अशा स्थितीत पोलिस आरोपीच्या जवळ असने आवश्यक होते मात्र दुसरा आरोपी नेहरू राठोड, ज्याचेकडून पोलिसांनी दहा हजार रुपये घेतले तो आरोपी अशोक पेठे यांच्या पत्नीला घेवून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आला असता पोलिसांनी त्याला गाडीत बसवून जीवतीला नेले आणि अशोक पेठे या गंभीर आरोपीला वाऱ्यावर सोडले.
या सर्व प्रकरणात जीवती पोलिस स्टेशन चे ठाणेदार पुल्लरवार, पोलिस कर्मचारी राठोड व गोपाल नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या या भ्रष्ट आणि क्रूरपणे मारहाणीत अशोक पेठे हा गंभीर अवस्थेत गेल्याने या तीनही पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आता पीडितांचे नातेवाईक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जिल्हा पोलिस अधिक्षक आणि पोलिस महासंचालक यांना निवेदन देवून यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याने आता जीवती पोलिसांचे धाबे दणाणले आहे.