बिबट व अस्वलाच्या मृत्यूप्रकरणी वनविभागामार्फत गुन्हा दाखल


बिबट व अस्वलाच्या मृत्यूप्रकरणी वनविभागामार्फत गुन्हा दाखल

चंद्रपूर, 

दिनचर्या न्युज /

 : चंद्रपुर वनविभागातील भद्रावती शहराजवळ एक नर बिबट, एक मादी बिबट, पूर्णपणे वाढ झालेले एक नर अस्वल व एक मादी अस्वल मृत आढळून आलेले आहे. प्राथमिक अहवालानुसार व निरीक्षणानुसार या प्राण्यांचा मृत्यू विद्युत प्रवाह लागून झाला असावा असा कयास आहे. यासंदर्भात वनविभागाने गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

विभागीय वन अधिकारी चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर ,यांच्याकडून प्राप्त झालेल्या या वृत्तानुसार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार चंद्रपूर वनविभागातील भद्रावती शहराजवळ मृतावस्थेत हे प्राणी आढळून आले आहे. आयुध निर्माणी चांदा वसाहतीमधील नवीन डीएससी कॉलनी या परिसरात एक नर बिबट, एक मादी बिबट, एक नर अस्वल व एक मादी अस्वल मृतावस्थेत आढळून आले आहे. विभागीय वन अधिकारी एल सोनकुसरे, सहाय्यक वनसंरक्षक एस एल लखमावाढ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोटतलवार ,डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ एकता शेडमाके, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी मुकेश बांधकर, मानव वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, एनटीसीएचे प्रतिनिधी श्रीमती एस. वि. महेशकर आदींच्या उपस्थितीत हे शवविच्छेदन करण्यात आले. यासंदर्भात वन गुन्हा नोंदविण्यात आला असून विद्युत प्रवाह लागून झालेल्या या मृत्यूची पुढील तपासणी करण्यात येत आहे.