या देशात राहायचं असेल तर ओबीसीची जनगणना करावेच लागेल- कल्याण दळे यवतमाळ (वणी) :-

या देशात राहायचं असेल तर ओबीसीची जनगणना करावेच लागेल- कल्याण दळे

यवतमाळ (वणी) :-
 वणी येथे विदर्भस्तरीय नाभिक उपवधू-वर परिचय मेळावा महाराष्ट्र नाभिक महामंडळ वनी तालुका शाखा यांच्याद्वारे आयोजित करण्यात आला होता.  29 फेब्रुवारी 2020 रोजी  झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष तथा  ओबीसी चे नेते बारा बलुतेदार महासंघाचा बुलंद आवाज माननीय कल्याणजी दळे  यांनी या  मेळाव्यात संबोधित करताना म्हणाले की, या  देशात राहायचे असेल तर ओबीसीची जनगणना करावेच लागेल,  हा देश कुणाचा जर असेल, तो आमच्या देशभक्तांचा आहे. ज्या देशभक्तांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले त्याबरोबरच  शिवरत्न जीवाजी महाले,  या थोर  महापुरुषाचा हा देश आहे,  या देशात भारत माता,  की जय,  वंदे मातरम की जय,  मन्या.. बरोबरच या देशात ओबीसी की जय म्हणून या सरकारला ओबीसीची स्वतंत्र  जात निहाय जनगणना करावीच लागेल.  या देशात इतर घटका प्रमाणेच सर्वांना समान हक्क समान कायदा नागरिकत्व,  आणि आरक्षण मिळाले पाहिजे,  माणसाने विचारात्मक आणि समाजप्रबोधनात्मक विचार मांडले पाहिजे, माझा समाज प्रथम सुखी झाला पाहिजे,  या समाजाला मिळणाऱ्या सुख सुविधा शिक्षणाचा हक्क हा मिळाला पाहिजे,  या वधू-वर परिचय मेळाव्यात जी वधू-वर आली आहेत. ती शिक्षित मुलगा मुलगी आहे का, हे सर्वप्रथम पाहिल्या जाते,  म्हणून माझा समाज हा पहिले सुशिक्षित झाला पाहिजे. हक्काच्या आरक्षण मिळाले पाहिजे,  यासाठी व्यवस्थापनात सुधारणा झाली पाहिजे.  आतापर्यंत जी सुविधा मिळाली नाही,  आता या सरकारने ओबीसी महासंघातील आपल्या समाजासाठी  शंभर कोटीची तरतूद केली आहे.  त्यामुळे समाजातील गोरगरिबाला फुटपाथ वर काम करणारा सलून वर्गांना याचा फायदा होणार आहे.
 नाभिक समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारकडे पाठविणे,  बारा बलुतेदारबलुतेदारांचे  आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून अगदी मोजक्या कागदपत्रावर कर्ज उपलब्ध करून देणे,  शिवरत्न जिवाजी महाले यांचे राष्ट्रीय स्मारक प्रतापगडावर उभे करणार येणार आहे. त्यासाठी शासनाकडून पाचशे कोटीचा निधी प्राप्त करून देण्यात आला आहे.  अशा विविध विषयावर या मेळाव्यात ओबीसीचे नेते कल्याणजी दळे  यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
 या कार्यक्रमाचे उद्घाटक शाळा संस्थापक माननीय राजेंद्र भाऊ नागपुरे,  कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणजी दळे,  महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांतअध्यक्ष,  माजी  अर्थमंत्री वनमंत्री मा.   सुधीरभाऊ मुनगंटीवार,  वनी चे नगराध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे,  वनी चे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार,  महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे  प्रांत कार्याध्यक्ष  दामोदरजी बिडवे,  विजयजी धारकर,शाम राजूरकर, सोपान कणेकर,  मनाले की, समाज परिवर्तन ही संसाराची गरज आहे. स्वतःच्या जातीचा अभिमान  असला पाहिजे,  मात्र त्याच्या जातीचा द्वेष नको!  समाजात मी माणूस म्हणून आले पाहिजे,  दुसऱ्याचे पाय उडणारे खेकडे नकोत,  स्त्रीला  मुळातच स्त्री असण्याचा सौंदर्य हेच तिच्या स्त्री सुंदरतेच देन आहे.  आणि  महिलांनी सासऱ्याच्या अंगावरचे पांघरूण  पडलेला उचलून हे जर त्याच्या अंगावर टाकलं तर हीच संसाराची खरी ओळख आहे असे मत यावेळी व्यक्त केले. 
आणि मंचावरील प्रमुख अतिथी या भरगच्च कार्यक्रमात समाज बांधवांची मोठी गर्दी केली होती. समाजातील गुणवंत आणि समाज भूषण पुरस्काराची सन्मानित व्यक्तींचे सत्कार यावेळी करण्यात आले, मेळाव्यात शेकडोंच्या संख्येने उपवधू-वर यांनी आपली परिचय करून देण्यात आले. या   कार्यक्रमाचे संचालन सौ.  सरोजताई चांदेकर चंद्रपूर यांनी केले तर या कार्यक्रमाचे यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ तालुका शाखा वनी  जिल्हाअध्यक्ष गुड्डू भाऊ नक्षीने,  चिटणीस अंबादास धामोरे,  जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश अमोलकर ,  संजय नक्षीने ,   विजय हनुमंते,  विनोद कडूकर,  विनोद धाबेकर,  निखिल मांडवकर,  सर्व कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला यशस्वी  करण्यात मोलाची भूमिका पार पडली.