महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू ठेवाव्या - सरपंच डॉ. शरद रणदिवे
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू ठेवाव्या - सरपंच डॉ. शरद रणदिवे

चंद्रपूर :राज्यातील विध्याथाना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने मागील सरकारने दि १४ डिसेंबर २०१७ रोजी मंत्रीमंडळ बैठकीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले व त्या अनुषंगाने १९ डिसेंबर २०१८ पहिल्या टप्प्यात १३ शाळा व दुसऱ्या टप्प्यात ६८शाळा असा एकूण राज्यात ८१ आंतरराष्ट्रीय शाळा सुरू केल्या. त्या पैकी गट  ग्रामपंचायत नागाळा (सि) अंतर्गत मौजा चिंचाळा येथे भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चिंचाळा येथे आहे. या शाळेत विद्यार्थीची संख्या फार मोठा प्रमाणात आहे. आणि हा ग्रामीण भाग असल्याने अशा आंतरराष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या दर्जाची शाळा या परिसरात उपलब्ध नाही. या शाळेत विद्यार्थीचां उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. तरी शासनाने ही शाळा बंद करू नये, हि शाळा पुर्व वत चालू ठेवावी. घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले. याावेळी 
नागाळा  (सी) चे सरपंच डॉ. शरद रणदिवे, तालुका महामंत्री भाजप चंद्रपुर, अतिश चिमुरकर, सदस्य ग्रामपंचायत नागाळा सी, शंकर बोबडे, पंकज महारतले यांची उपस्थिती होती.