धारीवाल कंपनीमधील जनक राणे नावाच्या कामगाराचे प्रेतच केले गायब? आकस्मिक अपघाताची नोंद,

धक्कादायक :-धारीवाल कंपनीमधील जनक राणे नावाच्या कामगाराचे प्रेतच केले गायब? आकस्मिक अपघाताची नोंद,

दुर्दैवी घटना :-

कंपनी व्यवस्थापन करताहेत कामगाराच्या नातेवाईकांना मोबदला देण्यास टाळाटाळ, कंपनी गेट जवळ मनसे शिवसेना या राजकीय संघटना सोबतच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली कंपनीकडून मोबदला देण्याची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी येथील धारीवाल या विज निर्मिती कंपनी मध्ये रात्र पाळीत असलेल्या जनक राणे या कामगारांचा म्रुत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली होती, धारीवाल कंपनीच्या गोडाऊन चे काम सुरू असतांना रात्र पाळीत काम करतांना रात्रीला त्याची ड्युटी एमआयडीसी मधील कॉंक्रीट प्लांट मध्ये असतांना रात्रीला त्याचा अपघात होऊन म्रुत्यु झाल्याचे बोलल्या जात असले तरी कंपनी व्यवस्थापण हे सत्य मानायला तयार नाही.परंतु पोलिसांच्या मदतीने जनक राणे याच्या बॉडीला जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी पोस्टमार्टेम करण्यासाठी नेल्यावर त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. विशेष म्हणजे ठेकेदाराचा रात्रीला जवळपास १ ते १.३० वाजता म्रुतक जनक राणेंच्या मोबाईलवर फोन आला होता हे कॉल्स डिटेल्स वरून स्पष्ट झाल्याने त्याचा म्रुत्यु हा कंपनीच्या कामावर असतांना झाला असल्याचे शीद्ध होते, मात्र कंपनीने ही बातमी प्रकाशित करण्यापर्यंत पीडितांच्या नातेवाईकांना मोबदला न देता त्याचे प्रेतच गायब केल्याने कामगारांमधे असंतोष निर्माण झाला आहे, ताडाळी येथे किरायाने राहत असलेल्या मूळच्या गोंदिया जिल्ह्यातील जनक राणे हा काली कन्स्ट्रक्शन कंपनीमधे सुपरवाईजर म्हणून काम करीत होता. त्यांच्या आकस्मिक म्रुत्युने कामगारांवर व त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. दरम्यान कणकम यांचेकडे कॉंक्रीट प्लांट वर सुपरवायजर म्हणून जनक राणे यांची रात्रीला प्लांट मध्ये ड्युटी होती. हे त्यांच्या ऐकून मोबाईल कॉल्स डिटेल्स वरून शीद्ध होते. त्यामुळे त्याचे वडील लक्ष्मण राणे यांनी म्हटले आहे की कंपनीने माझ्या मुलाचा जीव घेतला आहे त्यामुळे कंपनीने मोबदला द्यायला हवा तरच आम्ही अंतीमसंस्कार करेन अन्यथा आम्ही अंतीम संस्कार करणार नाही. याबाबत पोलिसांची मध्यस्थी महत्वाची असली तरी जोपर्यंत कंपनी मोबदला जाहीर करणार नाही तोपर्यंत यांवर तोडगा निघणार नसल्याने वातावरण चिघळन्याचे चित्र निर्माण झाले आहे.