नाभिक समाजातील सलूनधारक, कारागीर यांना प्रति कुटुंब पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे- नाभिक कर्मचारी संघ व एक महिला मंडळ यांची मागणी!




नाभिक समाजातील सलूनधारक, कारागीर यांना प्रति कुटुंब पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे- नाभिक कर्मचारी संघ व एक महिला मंडळ यांची मागणी!

:प्रतिनिधी दिनचर्या न्युज :-
वणी :-जिल्‍हा यवतमाळ
देशात सध्या कोरोना वायरसने मोठे थैमान घातले आहे. देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू असून संपूर्ण राज्यात ही परिस्थिती असता महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा रेट झोनमध्ये असून लाकडाऊन डावून पासून आता पर्यंत नाभिक समाज बांधवांनी आपले प्रतिष्ठाने शासनाच्या आदेशाचे पालन करून बंद ठेवली आहे. मात्र हा समाज रोज कमावून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करणारा समाज आहे. सर्वच दुकानदार दुकानात काम करणारा कारागीर यांच्यावर आता उपासमारीची पाळी आली आहे. या सर्व बाबीचा विचार करून नाभिक कर्मचारी संघ व नाभिक महिला मंडळ वणी यांनी आमदार साहेब यांच्यामार्फत राज्य शासनाला, कर्नाटक राज्या प्रमाणे, महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजातील सलून मालक, कारागीर प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये मासिक आर्थिक सहाय्य देण्यात यावे. तसेच उपजीविकेसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्यात यावा शक्य असल्यास रेड झोन मधील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी किंवा इतर तालुकात्यात आपल्याला जे योग्य वाटेल त्या अटी व शर्तीवर सलुन दुकान सुरू करण्यात यावा यासाठी वणी येथील नाभिक कर्मचारी संघ नाभिक महिला मंडळाचे
, बंडूभाऊ येसेकर, सुरेश मांडवकर, प्रवीण नागपुरे, विजय कडू कर,  हेमराज कडुकर,  अशोक मांडवकर,  भालचंद्र,  किशोर निंबाळकर,  नरेश नक्षीने,  श्रीमती छाया नक्षीने,  राजू निंबाळकर,  प्रशांत घुमे,  यांनी केली आहे.