तीन महिन्‍यांचे विज बिल माफ करण्‍याची भाजपाची मागणी

तीन महिन्‍यांचे विज बिल माफ करण्‍याची भाजपाची मागणी एप्रिल, मे, जून 2020 या तीन महिन्‍यांचे विज बिल माफ करण्‍याची भाजपाची मागणी*
*जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा यांच्‍या नेतृत्‍वात शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिका-यांना सादर केले निवेदन*
चंद्रपूर :दिनचर्या न्युज

राज्‍यातील विज ग्राहकांचे एप्रिल, मे, जून 2020 या तीन महिन्‍यांचे विज बिल माफ करण्‍याची मागणी भाजपातर्फे राज्‍य शासनाला करण्‍यात आली.
सदर मागणीसाठी भाजपाचे चंद्रपूर जिल्‍हाध्‍यक्ष तथा बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूरच्‍या महापौर राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्‍य संजय गजपूरे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष तथा जि.प. सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे यांच्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेतली व निवेदन सादर केले.
कोरोना विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्‍या लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद झाले आहे, अनेक कामगारांवर त्‍यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. अनेक लहान मोठे व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे व्‍यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहे, शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत आहे. नवा हंगाम सुरू झाल्‍यामुळे बि-बियाणे, खते खरेदीसाठी हाती पैसा नाही. सर्वच घटक आर्थिक अडचणीत आहेत. यामुळे राज्‍य सरकारने एप्रिल, मे, जुन 2020 या तीन महिन्‍यांचे विज बिल माफ करून राज्‍यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपातर्फे करण्‍यात आली आहे. शिष्‍टमंडळाच्‍या भावना व मागणी शासनाकडे त्‍वरीत सादर करण्‍यात येईल असे आश्‍वासन जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाला दिले.

दिनचर्या न्युज