विस्तार अधिकारीसह भिसी ग्रामपंचायतचे महिला सरपंच, उपसरपंच , ३० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!
विस्तार अधिकारीसह, भिसी ग्रामपंचायतचे महिला सरपंच, उपसरपंच , ३० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

चिमूर (भिसी) प्रतिनिधी
भिसी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी येवले यांनी नियमबाह्य काम केल्या बद्दल निलंबित करण्यात आले होते. त्यांची तक्रार गामपंचायतचे पदाधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कडे केली होती. त्या अनुषंगाने त्याची चौकशी चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमणे यांच्याकडे होती.
हे प्रकरण दाबण्यासाठी विस्तार अधिकारी हुमणे, व भिसी ग्रामपंचायतचे महिला सरपंच योगिता गोहणे, उपसरपंच लिलाधर बन्सोड यांनी येवले यांना ३० हजाराची लाच मागितली.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत भिसी येथील महिला सरपंचासह उपसरपंच ही लाचलुचपत विभागाच्या पथकाने तीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले गेले. ग्रामविकास अधिकारी यांच्या कारवाई,वरून आज चिमूर येथे हुमणे त्यांच्या रूमवर भिशी येथील ग्रामपंचायतचे महिला सरपंच, उपसरपंच यांना चंद्रपूर येथील अँटी करप्शन च्या पथकाने अटक केली. कारवाई चिमूर पोलीस स्टेशनमध्ये होत असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. चिमूर तालुक्यातील भिसी हे सर्वात मोठे ग्रामपंचायत असलेले गाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र चिमूर तालुक्यात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील कारवाई लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत.