पोलीस दलाच्या भरोसा सेल व पोलिस योध्दात रोहित तुराणकर यांची निवड!पोलीस दलाच्या भरोसा सेल व पोलिस योध्दात रोहित तुराणकर यांची निवड!

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाच्या भरोसा सेल व पोलीस योद्धा उपक्रमाचा आज दि. २७ जुलैला शुभारंभ करण्यात आला.
पोलीस दलाच्या भरोसा सेल व पोलिस योध्दात रोहित तुराणकर यांची निवड करण्यात आली आहे.
भरोसा सेल या उपक्रमात पीडित महिला व बालके यांच्याकरिता एकाच छताखाली समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. पोलीस मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
तर कोरोना संक्रमण काळामध्ये पोलीस दलाला अतिरिक्त कुमक उपलब्ध व्हावी यासाठी पोलीस योद्धा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये ४०० युवकांनी सहभाग नोंदवला आहे.

दिनचर्या न्युज