वीज बिल समजून घेण्यासाठी,
सोमवार दि. ०६.०७.२०२० रोजी
वेबिनार संवादाचे आयोजन* *ग्राहकांचे होणार समाधान, वीज ग्राहकांनी. सहभागी व्हावे : महावितरणचे आवाहन
चंद्रपूर,दि. 4 जूलै 2020, लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्यिक वीज ग्राहकांना विज बिलविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व ग्राहकांच्या वीज बिलविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाद्वारे *आपले वीज बिल समजून घ्या* या विषयावर ऑनलाईन वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी चंद्रपूर परिमंडलाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त घरगुती व वाणिजिक ग्राहकांनी सहभाग नोंदवून वीज बिलाविषयी असलेल्या शंकाचे निरासन करून घेण्याचे आवाहन महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे .
सोमवार दि. ०६.०७.२०२० रोजी दुपारी १२.०० ते ०२.०० या वेळेत घरगुती व वाणिज्य ग्राहकांसाठी होणाऱ्या वेबिनारमध्ये महावितरणने वितरित केलेले माहे एप्रिल, मे व जून महिन्यातील वीज बिल विषयी असलेला संभ्रम व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे . वेबिनार मध्ये सहभागी होण्याकरिता महावितरणच्या
https://meet.google.com/nor-dsxf-wny
या लिंकवर जाऊन घरगुती व वाणिज्यिक वीज ग्राहकांना सहभागी होता येईल. उच्चदाब व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांसाठी वीज बिल संदर्भात समस्या बाबत स्वतंत्रपणे वेबिनरचे आयोजन करण्यात येईल.
ग्राहकांच्या वीज बिलाविषयी समस्याचे निराकरण करण्यासाठी *आपले वीज बिल समजून घ्या* या वेबिनारमध्ये चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे , अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, संजय वैद्य, सर्व कार्यकारी अभियंते, सर्व उपविभागीय अभियंते व बिलिंग विभागाशी संबंधित अधिकारीही सहभागी होणार आहे. याशिवाय https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरही ग्राहक स्वतः आपल्या वीज बिलाची पडताळणी करू शकतात.