डॉ.सुनील टेकाम यांचा मृत्यू म्हणजे चंद्रपूर आरोग्य प्रशासनावर एक मोठा प्रश्न?




डॉ.सुनील टेकाम यांचा मृत्यू म्हणजे चंद्रपूर आरोग्य प्रशासनावर एक मोठा प्रश्न?

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज

एका युवा , होतकरू , जबाबदार , कर्तव्यनिष्ठ कोरोना योद्धा *डॉ.सुनील टेकाम (आरोग्य वैद्यकीय अधिकारी वरोरा )* यांचे निधन म्हणजे आरोग्य प्रशासनासाठी मोठी हानी तर आहेच पण चंद्रपूर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच डॉ टेकाम यांचा जीव गेला असा चंद्रपूरकरात सूर आहे .त्यांच्या जाण्याने सामाजिक दायित्वाचेहीं खुप मोठे नुकसान झाले आहे .डॉ सुनील टेकाम हे मूळचे राजुरा येथील असून वरोरा इथे आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत होते. डॉ.सुनील टेकाम यांचे नुकतेच लग्नं झाले होते त्यांच्या पत्नी सुद्धा आरोग्य सेवेत परिचारिका असून त्यांना मात्र दिड वर्षाची गोंडस मुलगी आहे .
डॉ सुनील टेकाम हे आपला डॉक्टर धर्म बजावण्यात कुठेही कमी पडत नव्हते .दिवस रात्र रुग्णांना सेवा द्यायचे आणी ह्या कोरोना काळात तर त्यांनी स्वतःला वाहूनच घेतले होते . व आपल्या डॉक्टर धर्मानुसार इमाने ऐतबारे कोरोना रुग्णांना सेवा देत होते .
अशातच अचानक त्यांना कोरोनाची लागण झाली .व त्यांनी स्वतःला चंद्रपूर येथे कोरंटाईन करून घेतले . स्वतः एक जबाबदार आरोग्य अधिकारी असल्याने त्यांनी स्वतःपासून कुठल्याही रोग्याला वा परिवाराला याची लागण होऊ नये म्हणून चंद्रपूरला कोरंटाईन करवून घेतले होते .ते चंद्रपूर येथील रेन्जर कॉलेज इथे 14 दिवस कोरंटाईन होते .15 व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज होणार तर अचानक लकवा मारला व त्यांना तात्काळ चंद्रपूर covid रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय , चंद्रपूर ) इथे रेंजर कॉलेज इथून दाखल केले .15 वा दिवस जसा तसा निघाला व 16 वा दिवस म्हणजे आज रोज 21/08/2020 ला सकाळी त्यांच्या भगिनी व आईसोबत video call द्वारे व्यवस्थित वाटत असल्याचे बोलणे झाले .पण त्यानंतर दुपारी 12:00 वाजता दरम्यान त्यांच्या प्रकुर्तीत बिघाड येत असल्याचे कडाले .ह्या दरम्यान त्यांना नागपूरला हलविण्याचे हीं सूत्र राबविल्या गेले .मात्र त्यांच्या प्रकुर्तीत सातत्याने होत असलेल्या बिघाडामुळे ते शक्य झाले नाही . अत्यंत कसोशीचे प्रयत्न हीं डॉ.सुनील टेकाम ह्यांना वाचविण्यात असमर्थ ठरले .व डॉक्टर टेकाम हे निसर्ग शक्तीत विलिन झाले .त्यांच्या मरणाची बातमी जनतेत वाऱ्यासारखी पसरली व सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या गेली व लोकांच्या सहानुभुतीचा जमाव चंद्रपूर कोव्हिड रूग्णालयासमोर आला व प्रशासन कुठेतरी चुकले काय
म्हणून कोरोना काळात जबाबदारीने कर्तव्य बजावीणा-या डॉक्टरला जीव गमवावा लागला .असा सवाल घेऊन डॉ सुनील टेकाम यांना शहीद स्तरावर मानवंदना व्हावी अशी मागणी करू लागला . जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना ह्याबाबतीत स्थानिक जिल्हा प्रतिनिधिनीहीं कळविले व मागणीकरिता जातीने हजेरी लावली व अखेर डॉ.सुनील टेकाम यांना शहीद रूपी श्रध्दांजली वाहिल्या गेली .
ह्या दरम्यान चंद्रपूर आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार असा की , स्थानिक प्रशासन का म्हणून किंवा कूठे दुर्लक्षित झाले म्हणून एका आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याला जीव गमवावा लागला ? हा भला मोठा प्रश्न पुढे येतो . प्रशासन कोरोनावर वास्तविक द्रुष्टीने किती सजग आहे व किती नाही .म्हणून 14 दिवस एका डॉक्टर सारख्या व्यक्तीला कोरंटाईन काळात बरे करता आले नाही ? वा त्यानंतर त्यांना 15 व्या दिवशी कोव्हिड मधून सुटका होणार तोच त्यांना लकवा मारला ? बरं लकवा मारला तर मारला त्यांना चंद्रपूर आरोग्य प्रशासनाने का म्हणून नाही नागपूर सारख्या ठिकाणी हलविण्याचा सल्ला त्यांच्या घरच्यांना दिला ? कोव्हिड रुग्णालयात जातीने कोण लक्ष देतो ? कुठले डॉक्टर उपलब्ध आहे? किंवा त्या अतिदक्षता विभागाला सेवा सुविधा देणारे डॉक्टर घरून तर रूग्णालय ऑपरेट करीत नाही आहे ना ? हे कुणाला कसे कडणार ? त्या रुग्णालयांत सर्व सेवा सुविधा उपलब्ध आहेत की नाही आणी जर नसेल तर याला जबाबदार कोण ? असाही सवाल येतो .कारण की डॉ.टेकाम यांना एका इंजेक्शनची गरज होती व त्याची किंमत जवळपास 50,000/- इतकी होती आणी त्याची उपलब्धतता न झाल्यामुळे हीं डॉ.टेकाम यांचा जीव गेल्याची जिल्हा आरोग्य प्रशासनात चर्चा आहे .मग इतका कोट्या वधी रुपयाचा खर्च जो होतोय तो काय फक्त स्वँब घेणे , व्ह्यायंटिलेटर वर ठेवणे , सलाईन लावणे व साहित्य उपलब्ध असलं तर पूर्तता करणे नाही तर ठण ठण गोपाळा ? असं कसं चालणार ?
हा विषय काही साधारण नसून ह्यावर गांभिर्याने विचार होने नितांत गरजेचे आहे.एका वैद्यकीय डॉक्टरचा जीव जाणे म्हणजे स्थानिक प्रशासनावर खुप मोठा प्रश्न आहे कारण एका आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याला ज्याचे वय केवळ 34 वर्षं त्याला ह्या covid मधून सावरण्यात आरोग्य प्रशासन असमर्थ ठरत असेल तर सामान्य व्यक्तीचे काय ? 

शहीद वीर डॉ.सुनीलजी टेकाम अमर है , अमर रहेंगे 
🙏 🙏 🙏 🙏 🙏