जातनिहाय जनगनना साठी उद्या लाखोंच्या संख्येत ओबीसी बांधव उतरणार रस्त्यावर!
जिल्ह्यात उद्या रचला जाणार इतिहास!
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
जनगणनेत इतर मागास प्रवर्गासाठी वेगळा कॉलम ठेवण्यात यावा ह्या मागणीसाठी चंद्रपूर येथे उद्या ओ बी सी मोर्चा आयोजित करण्यात आला असुन याकरिता जिल्ह्यातून हजारो ओ बी सी बांधव उपस्थित राहणार आहे.
ह्याशिवाय ईतर मागास प्रवर्गातील आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागु नये, इतर कुठल्याही जातींनअ आरक्षण देताना ओ बी सी प्रवर्गात त्यांचा समावेश करण्यात येऊ नये ह्या मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित केला असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात अनेक जाती आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे. भारतीय घटनेनुसार कलम 340 नुसार देशातील ओ बी सी करीता 27% टक्के आरक्षण दिले आहे त्यानुसार जातीतील लोकांना जनगणनेनुसर आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. मात्र स्वतंत्र भारतात ओ बी सी ची जनगणना आजपर्यंत केली नाही. 340 कलम ही सर्वसामान्यांसाठी 341 कलम एस सी व 342 कलम एस टी करीता असल्याने देशातील जनगणना तीन विभागात करून त्याचा फायदा जनतेला देण्यात आला असून राज्यात एकाची जात आर्थिक दृष्ट्या सक्षम नसेल तर विशेष अधिकार वापरून सवलत देता येते मात्र घटनेनुसार सर्व बाबी विचारात घेऊन देता येते.
भारतीय घटनेनुसार कलम व उपविधी याचा सखोल संशोधन करूनच निर्णय घेतला जातो. ओ बी सी चे घटनादत्त अधिकार कमी करू नये म्हणून ओ बी सी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे ओ बी सी जनगणना समन्वय समिती यांनी सांगितले आहे.