गट ग्रामपंचायत येरखेडा- कळमगाव सरपंचपदी संजय गेडाम यांची वर्णी





गट ग्रामपंचायत येरखेडा- कळमगाव सरपंचपदी संजय गेडाम यांची वर्णी

दिनचर्या न्युज :-
चिमूर :-
तालुक्यातील चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत येरखेडा- कळमगाव येते सरपंच पदासाठी दिनांक 12/ 2 /2021 ला निवडणूक घेण्यात आली. मात्र ही निवडणूक एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. येते दलित समाजातून निवडून आलेल्या स्वतंत्र उमेदवार श्री संजय बळीराम गेडाम यांनी सरपंच पदावर 3/2 असा विजय मिळवून सरपंच पदाची माळ गळ्यात घातली. राजकीय पक्षाला कलाटणी देऊन भाजप आघाडी प्रणित बहुमत सदस्य असताना  ज्या सदस्यांना सरपंच पदाची लालच दिली होती.  त्या सदस्याला सरपंचपद न मिळाल्याने व बोललेले शब्द न पाडल्याने  ग्रामपंचायत सदस्य रेणुका कुडे यांनी  संजय गेडाम यांना सरपंच पदासाठी  समर्थन दिले. आणि सौ. वर्षा यशवंत येलेकर यांनी उपसरपंच पदाची माळ गळ्यात घातली.  ही गट ग्रामपंचायत  सात सदस्यीय असून  सरपंच पदाचे आरक्षण  खुल्या प्रवर्गासाठी  असल्याने  सरपंचपद कोणाच्या गळ्यात जाईल याची रस्सीखेच चालू असताना येथील एका उमेदवाराचे  पलायन करण्यात आले होते.  तर एका  जागेची निवडणूक न झाल्याने ते रिक्त पद राहिले.  आणि यातच स्वतंत्र उमेदवार संजय गेडाम यांनी सरपंचपदाची बाजी मारली. तर उपसरपंचपदी सौ वर्षा यशवंत येलेकर
 यांची वर्णी लागली.  सौ रेणुका प्रदीप कुडे ह्यासोबत राहिल्या.
 या निवडणुकीत राजकीय पक्षाला कलाटणी देऊन एका अपक्ष उमेदवार आणि तेही दलित असलेला उमेदवाराने ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान झाल्याने परिसरात चांगलेच चर्चिले जात आहे.