वसंत देशमुख भाजप सोडणार का ?




वसंत देशमुख भाजप सोडणार का ?

दिनचर्या न्युज :- चंद्रपूर
नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी दावेदार असलेल्या वसंत देशमुख यांना त्यांच्याच पक्षांनी विश्वास घात केल्यामुळे वसंत देशमुख हे पक्ष तथा पक्षश्रेष्ठीवर प्रचंड नाराज झाल्याने एकीकडे चंद्रपूरकरांमध्ये निष्ठावान कार्यकर्त्याचा केलेला अपमान असहाय्य झाल्याची शल्य बोचत आहे. तिथे पक्षांतील नगरसेवक सुद्धा पक्षाबाबत उदासीन दिसत आहे .तर अशातच भाजप पक्षाच्या वतीने वसंत देशमुख यांची मनधरणी तथा समर्थन करण्याकरिता विविध पक्षांचे आमदार, खासदाराचे फोन प्रत्यक्ष भेटीचे सत्र चालू झाले असताना गोपनीय माहिती पुढे आली की , वसंत देशमुख यांना सर्व प्रमुख पक्षातर्फे खुले निमंत्रण असून त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी मागेल त्या अटीवर वसंत देशमुख यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यास तयार असल्याचे कळते .
प्राप्त माहिती नुसार असेही कळले की , विविध स्तराच्या शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना वसंत देशमुख यांच्या वर झालेल्या अपमानाबद्दल विचारणा सुरूच आहे. .त्यामुळे सुधीर मुनगंटीवार व त्यांचे अति जवळचे समजले जाणारे देवराव भोंगळे जे ह्या सभापती पदाच्या प्रणालीत मुख्य सूत्रधार होते त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली दिसते .कारण तसं नसतं तर सुधीर मुनगंटीवार यांना वसंत देशमुख यांच्या फोनवर शंभर फोन करण्याची गरज नव्हती? देवराव भोंगळे यांना वसंत देशमुख यांच्या घराच्या चक्करा घालाव्या लागल्या नसत्या . म्हणून ही मनधरणी कुठल्या शिगेला पोहचेल व येत्या काळात वसंत देशमुख कुठल्या भूमिकेतून आपल्या तीस वर्षाच्या निष्ठावानपणाचा अपमान झाल्याबद्दल निर्णय घेतात हे बघण्यासारखे होईल?
.कारण वसंत देशमुख यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पक्ष श्रेष्ठींना वसंत देशमुख हा प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचा अपमान असून पक्षश्रेष्ठींनी नामांकन अर्ज दाखल करायच्या अर्ध्या तासा आधीपर्यंत अंधारात ठेऊन जो हेतुपुरस्सर अन्याय केला त्याचे उत्तर मागितले होते . पत्रकार परिषदेतून विचारलेल्या प्रश्नाला सामोरे जात देवराव भोंगळे यांच्या वतीने स्पष्टीकरण दिल्या गेले की , आमच्या पक्षाने आजपर्यंत वसंत देशमुख यांना भरपूर दिले आहे. त्यांच्या अपमान मुळीच केला नाही. पत्रकार परिषदेचा आरोप चुकीचा आहे असं मत मांडले .
तर मग वसंत देशमुख यांची सातत्याने मनधरणी कशासाठी ? हा येणारा काळ ठरवेल व वसंत देशमुख नेमका कुठला निर्णय घेतात हे गुलदस्त्यात असून सध्या तरी चंद्रपूरचा भाजपने वसंत देशमुख यांच्या जो नाथाभाऊ झाला याची चर्चा सुरू आहे .म्हणून वसंत देशमुख वेळेप्रसंगी भाजप सोडणार तर नाहि ना ?