चिमूर आगारात मराठी भाषा गौरव दिन साजरा





चिमूर आगारात मराठी भाषा गौरव दिन साजरा

चिमूर, प्रतिनिधी:- दिनचर्या न्युज :-

राज्य परीवहन महामंडळ चिमूर आगारात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम शनिवारी १२.०० वाजता विभाग नियंत्रक, चंद्रपुर सेवाराम हेडाऊ यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
शासनाच्या निर्देशनुसार कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो.त्याअनुषंगाने राज्य परीवहन महामंडळ चिमूर आगार येथे प्रवाशांना पुष्पगुच्छ देंउन स्वागत करण्यात आले.  
       कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन प्रभारी आगार व्यवस्थापक इमरान शेख, पत्रकार भरत बंडे, चार्जमन संजय घोनमोडे, सहा.वाहतुक निरीक्षक युवराज वाधमारे, लेखापाल लता गेडाम, वरीष्ठ लिपिक निलकंठ दोडके आदी मान्यवर उपस्थित होते.  दरम्यान मराठी भाषेचा वापर हा दैनंदीन कामकाजात व व्यवहारात करावा, कारण मराठी ही मातृभाषा आहे. तेव्हा मराठीचा अभिमान बाळगावा,असे आव्हान विभाग नियंत्रक,चंद्रपुर सेवाराम हेडाऊ यांनी आपल्या मार्गदर्शनातुन प्रवाशांना केले.  कार्यक्रमाचे संचालन वरीष्ठ लिपिक होमराज सिडाम यांनी केले व आभारप्रर्शन यशवंत झाडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदलाल तिवारी, मिरा राठोड, नमिता निनावे, बालाजी भदभजे, दिपक कोरेकर, मिथुन चव्हान, प्रशांत नौकरकर, गजानन पुल्लुरवार आदिंनी परीश्रम घेतले.