पिंपरी (धानोरा) येथे सेवानिवृत्त वनकर दांपत्याचा सत्कार




पिंपरी (धानोरा) येथे सेवानिवृत्त वनकर दांपत्याचा सत्कार


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर जिल्ह्यातील पिपरी धानोरा येथे गेली वीस वर्षापासून आरोग्य सेविका म्हणून कु. शोभा वनकर व जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून श्री विलास वनकर यांनी धानोरा पिंपरी येथील सेवा कार्यात आपले अर्ध्यापेक्षा जास्त सेवारत कार्य धानोरा गावात दिले. या सेवेची जाणीव ठेवत वनकर दांपत्याचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार गावातील अंगणवाडी, आशा वर्कर, ग्रामपंचायत मिळून करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. वैशाली माथने, माजी सरपंच पारस पिंपळकर, ग्रामपंचायत सदस्य भूवान चिने, माया मुसळे , वर्षा निब्रड, सुनिता मते, रामटेके मॅडम , पोले मॅडम, रीना पिंपळकर, सीमा बावणे, ग्रामसेवक मुनगंटीवार, चंदू माथणे, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती.
 यावेळी सत्कार मूर्ती यांनी  हृदयस्पर्शी  बोलताना म्हणाले की,  धानोरा या गावात नोकरी करताना  गावकऱ्यांनी अतिशय प्रेम आणि वेळोवेळी सहकार्य केले आपल्या सहकार्यामुळेच मी या गावात शासकीय सेवेत असताना सुद्धा आपल्यात रमून मला सेवा करण्याची   संधी दिली. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही किंवा कुठलीही तक्रार नाही अशा प्रकारची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सदैव आपला सर्वांचा ऋणी आहे. असेच प्रेम राहावे  ही सदिच्छा बाळगतो.  या कार्यक्रमाचे  संचालन रंगराव पवार यांनी केले. तसेच गावातील नागरिकांची उपस्थिती होती.