गडपिपरीचे सरपंच पद आरक्षणाचा घोळात अडकले, सहा महीण्यापासून प्रतिक्षेत!
दिनचर्या न्युज :-
चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत गडपिपरी या सह चिमूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षणाच्या घोळामुळे अडकले आहेत. सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र आज पर्यंत गडपिपरी येथील सरपंच भरण्यात आले नाही.अजून पर्यंत कोठलेही आरक्षणाचे फर्मान शासन प्रशासनाने जाहीर केले नाही. ज्या आरक्षणाचे सरपंच पद जाहीर झाले त्या आरक्षणाचा उमेदवार नसताना सुद्धा आरक्षण कसे काय काढण्यात आले होते?. प्रशासनाला आरक्षण असलेल्या सदस्यांची यादी माहिती नव्हती का? मग का बर हा घोळ प्रशासन कडून झाला असेल! तर मग आता सरपंच पदाचे काय? आता पर्यंत गडपिपरी येथे ओबीसी सरपंच पदाची सोडत काढण्यात का आली नाही? अशा प्रश्न गावातील नागरिकांना उपस्थित होत आहे.
म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर सरपंच पदाची सोडत काढून गावातील नागरिकांचा समस्यांचे निराकरण करावे. या घोळामुळे गावातील विकास कामांचा खेळ खोळंबा होतं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. निवडणूक आदिच हा आरक्षणाचा घोळ झाला असल्याने निवडून आलेल्या उमेदवाराचा आशेवर पाणी फेरल्या गेले.
सध्या ग्रामपंचायचा कारभार प्रभारी (उपसरपंच)च्या भरोशावर सुरू असून तो सुद्धा बाहेर गावचा असल्याने ग्रामपंचायत सदस्य यांच्यात एक निष्ठता नसल्याचे सांगितले जात आहे. गडपिपरी ग्रामपंचायतला ग्रामसेवकही पुर्ण वेळ नसल्याने अनेक अडचणीला गावकऱ्यांना सामोर जावे लागत आहे. तरी या ग्रामपंचायतला पुर्ण वेळ ग्रामसेवक मिळावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे .
म्हणून प्रशासनाने या बाबतीत लक्ष देऊन लवकरात लवकर सरपंच सोडत जाहीर करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
दिनचर्या न्युज