ऐन पावसाळ्यात शिवणपायली येथील नागरिकांचा घसा कोरडा
- 15 दिवसापासून नळाला पाणी नाही
- पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण
दिनचर्या न्युज :-
चिमूर,
तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या सिरपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत शिवणपायली येथील गावकऱ्यांचे ऐन पावसाळ्यात नळाला पाणी नसल्यामुळे मागील 15 दिवसापासून घसे कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रा प कार्यालयात याबाबत माहिती देऊन नळयोजना पूर्वरत सुरू करून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवणपायली येथील नागरिकांनी केली आहे.
शिवणपायली येथे पाण्याच्या टंचाई मुळे सन 2011-12 ला पाण्याची टाकी आणि नळयोजना मंजूर होऊन बांधकामाला सुरवात झाली. आणि 2015 मधे पूर्ण झाली. सन 2015 ला पाणी पुरवठा आणि नळयोजना सुरू करण्यासाठी वीज वितरण महामंडळाकडे विद्युत मिटर साठी डिमांड भरण्यात आले. परंतु आजतागायत या नळ योजनेला मिटर मिळालाच नाही. डिमांड भरले ते रुपये गेले कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या योजनेला बांधकाम पूर्ण होऊनही स्विच रुम नाही. परंतु नागरिकांच्या ओरडण्यामुळे पाणी पुरवठा समिती आणि ग्रा प ने डायरेक्ट वीज घेऊन नळ योजना सुरू केली, आणि गावात पाणी पुरवठा केला. परंतु मागील 15 दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.
सदर पाण्याच्या टाकी चे बांधकाम करण्यासाठी दोन कंत्राटदार यांनी कसे बसे काम पूर्ण केले. पाण्याच्या टाकीला झाकण सुद्धा लावले नाही. तसेच पुराचे पाणी विहिरी जात आहे. आणि पाणी वाहिनी पाईप शेतात फुटल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे गडुळ पाणी नळा ला येत होते. या गडुळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे या सर्व बाबीकडे ग्रापंचायतीचे दुलक्ष होत आहे. सदर योजना ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात आली आहे. पण ग्रामपंचायत म्हणते की हस्तांतरण झालेच नाही. आणि पाणीपुरवठा समिती बरखास्त करून ग्रामपंचायतला या योजनेची देखभाल करण्यासाठी देण्यात आली आहे. परंतु मागील पंधरा दिवसांपासून पाणी बंद असल्यामुळे पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अर्ध्या पेक्षा जास्त नळ धारकांना एक थेंब पाणी सुध्दा येत नाही. या संदर्भात ग्रा प ला अनेकदा सूचना अर्ज देऊनही नळ बंद आहेत. त्यामुळे आज शिवणपायली येथील नागरिकांनी ग्रा प कार्यालय गाठून पाणी पुरवठा योजना सुरू करून द्यावी अशी तंबी देत निर्वानी चा इशारा दिला. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा शिवणपायली येथील नागरिकांनी दिला आहे.
सदर नळ योजना ही डिमांड भरले नाही, म्हणून विद्युत पुरवठा स्थगित केला. परंतु डिमांडचे कागदपत्रे सादर केल्यामुळे विजवीतरण कंपनी मिटर लावून देण्यास तयार झाली आहे, आणि लवकरच पाणी पुरवठा योजनेला सुरवात होऊन गाकऱ्यांना पाणी मिळेल.
लोकचंद एन. भसारकर
ग्रामसेवक
गट ग्रा. प. सिरपूर.