नगरसेविका मंगलाताई आखरे, व सामाजिक कार्यकर्ते किशोर रायपूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर






नगरसेविका मंगलाताई आखरे, व सामाजिक कार्यकर्ते किशोर रायपूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
माता नगर लुंबिनी बुद्ध विहार येथे
दिनांक १३ /७/२०२१ ला मा.चांदेकर गुरूजी यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेविका मंगलाताई आखरे, व सामाजिक कार्यकर्ते किशोर रायपूरकर  यांच्या वाढदिवसानिमित्त  रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले .वार्डातील शेकडो युवकांनी स्वयंम रक्तदान शिबीरात भाग घेऊन रक्तदान केले. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  राजेंद्र वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक राजेंद्र आखरे यांनी केले. रक्तदान करणाऱ्या दात्याना लोकमत रक्ताच नात
यांच्या वतीने प्रमाणपत्र व बॅग घेऊन गौरव करण्यात आला. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांची चमूही उपस्थित होते. 
यावेळी संजय वैध, यांनी नगरसेविका मंगलाताई आखरे, किशोर रायपूरकर, यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करणे हे एक समाजातील फार मोठा उपक्रम असून या मुळे एखाद्याचे जिवन वाचवता येतो असे मत व्यक्त केले. 



यातून नवयुवकाना प्रेरणा मिळते. रक्तदान हि काळाची गरज आहे. प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. कोरोना काळात अनेकांना यातून समोर जावे लागले. म्हणून आपणही समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत परेंत रक्तदान का! केले पाहिजे याचे महत्त्व  नगरसेविका मंगलाताई आखरेनी सांगितले. यावेळी रक्तदान करणाऱ्यात अविनाश पेंदोर, किशोर रायपूरकर, शंकर मडाकाम, मुन्ना दिक्षित, राहूल सलामे, सुनील, शाहू, बंटी, सिनू, अजय यादव, अजय, राकेश, अणिल, बाबूल,मोहन चौधरी, किशोर, राजू तसेच वार्डातील नागरीकांनी सहकार्य केले.