विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ५ आँगस्ट २०२१ मुदतवाढ
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि. 23 जुलै : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. सदर संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दि. 5 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविला जात असल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत, असे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिलेली आहे.
नागपूर विभागातील महाविद्यालयामध्ये सन 2020-21 मध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन स्वरूपात सादर करावेत. विभागातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.
दिनचर्या न्युज