सावली वनपरिक्षेत्रातील 28 गावातील सौर पथदिवे चा कंत्राट संशयाच्या भोवर्‍यात?





सावली वनपरिक्षेत्रातील 28 गावातील सौर पथदिवे चा कंत्राट संशयाच्या भोवर्‍यात?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण( महा ऊर्जा) ही महाराष्ट्र शासनाची संस्था असून या संस्थेद्वारे सौर पथदिवे लावण्यासाठी सावली वनपरिक्षेत्रातील 28 गावांसाठी निविदा प्रकाशित केली गेली. निविदेचा कालावधी पंधरा दिवसाचा होता . पण ही वाढ पुन्हा हेतुपुरस्कर सात दिवसाची करून काही ठराविक कंत्राटदाराला वनपरिक्षेत्रातील राऊंड ऑफिसर यांनी साईड सर्वे रिपोर्ट मध्ये स्वाक्षरी दिली. परंतु सदर आरोनी दिलेली साईड सर्वे मध्ये प्रत्येक गावातील जागेला भेट दिल्याचा पुरावा नसून फक्त आरोने चिरीमिरी च्या साह्याने जवळच्या तीन कंत्राटदारांना जागेचा सर्वे रिपोर्ट दिला. असे माहिती अधिकारात स्पष्ट दिसून येते. यासंदर्भात आरो यांना विचारणा केली असता. वन परिक्षेत्र अधिकारी यांनी मला विचारल्याशिवाय कोणत्याही कंत्राटदाराला साईट सर्वे रिपोर्ट, सह्या द्यायचे नाही कसा खुला पैगाम सोडला! ज्यामुळे बाकीच्या मेडा टेंडर धारकांना टेंडर टाकता आले नाही. सावली वनपरिक्षेत्रातील 28 गावातील सौर पथदिवे च्या कंत्राट संशयाच्या भोव-यात असून अटी व शर्तीनुसार निवेदे मध्ये भाग घेण्यास इच्छुक असणाऱ्या उत्पादकांना प्रकल्प स्थळाची भौगोलिक, तांत्रिक, व्यवहाराच्या अनुषंगाने प्रकल्प कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून अहवाल साईट विजिट रिपोर्ट वर  लाभार्थी,  संबंधित विभागाची स्वाक्षरी  असणे बंधन कारक आहे. असे असताना सुद्धा वन परिक्षेत्र अधिकारी यांनी कुठलीहीशहानिशा न करता फक्त तीन कंत्राटदारांना राऊंड ऑफिसर यांच्या माध्यमातून स्वाक्षरी दिली  असल्याने कंत्राट संशयाच्या भोव-यात असून या प्रकरणाची संबंधित वरिष्ठ पातळीवरून चौकशी केली तर यात महाऊर्जा आणि वन विभागातील अधिकारी यांची साठगाठ  असल्याचे दिसून येते.